*शिवसेना जिल्हा उपप्रमुख पदी श्यामभाऊ गोसावी यांची नियुक्ती*……
संगमनेर / लोकवेध live न्यूज
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार शिर्डी विधानसभेची निवडणूक लक्षात घेता शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी कोल्हार बु.येथील ज्वलंत हिंदूवादी नेते व महाराष्ट्र राज्य दशनाम गोस्वामी समाजाचे नेते श्याम गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली. श्याम गोसावी हे शिवसेनेचे पूर्वीपासूनच कट्टर समर्थक असून या अगोदर विविध पदावर त्यांनी काम केले आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रात धडाडीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात ओळख आहे.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे शिर्डी मतदार संघ व संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे विविध संघटना व मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे
