संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या महासचिवपदी कल्याणराव जोर्वेकर
संगमनेर /लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी नुकतीच कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये तालुक्यातील पिंपरणे येथील आमदार बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक कल्याणराव जोर्वेकर यांची महासचिव पदी निवड झाली आहे. राज्यभरासह संगमनेर तालुक्यात अनेक युवक व युवती काँग्रेस पक्षात नव्याने सक्रीय झाले असून तालुका युवक काँग्रेसची नवीन कार्यकारिणी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी जाहीर केली आहे. यामध्ये पिंपरणे गावात राजकीय सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी व आणि पिंपरणे येथील शेतकरी विकास मंडळाचे युवा नेतृत्व कल्याणराव जोर्वेकर यांच्यावर युवक काँग्रेसच्या तालुका महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे आमदार बाळासाहेब थोरात यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून अनेक वर्षापासून युवकांचे संघटन करत आहेत अनेक सामाजिक कामे करत आहेत. त्यांच्या याच कामाची पावती म्हणून त्यांच्यावर युवक काँग्रेच्या नूतन कार्यकारिणीत महत्वाची महासचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे पिंपरणे ग्रामस्थांच्या वतीने तसेच शेतकरी विकास मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले पिंपरणे गावच्या वतीने गावचे सरपंच नारायण मरभळ, ज्येष्ठ नेते सुधाकरराव रोहम शिवराम वाकचौरे तंटामुक्ती अध्यक्ष अरुण देशमुख राजेंद्र देशमुख काकासाहेब गायकवाड उपसरपंच मीनीनाथ जोर्वेकर, राजहंस दूध संघाचे संचालक रवींद्र रोहम, राजेंद्र सयाजी देशमुख संजय बागुल अजित मांडे, अजित देशमुख डॉक्टर किरण काळे उत्तमनाना राहींज दिनकर ठोंबरे रावसाहेब ठोंबरे संजय जोर्वेकर निलेश बागुल राहुल बागुल सचिन जोर्वेकर सचिन राहींज राहुल निकम निलेश चत्तर संतोष वाकचौरे राजेंद्र वाकचौरे दत्तू काळे संदीप ठोंबरे प्रकाश ठोंबरे शुभम काळे दत्त वाकचौरे प्रकाश ठोंबरे संजय साळवे संदीप साळवे सुरेश साळवे गोकुळ काळे मधुकर काळे उत्तम भालेराव दीपक अभंग पप्पू कर्पे संजय गायकवाड संजय वाकचौरे यांनी कल्याणराव जोर्वेकर यांच्या निवडीचे अभिनंदन केले
महाराष्ट्र राज्य चे मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित दादा तांबे आमदार डॉ सुधीर तांबे साहेब युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष जयश्रीताई थोरात. इंद्रजितभाऊ थोरात राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजित दादा देशमुख गावातील बाळासाहेब थोरात साहेब यांचे सर्व कार्यकर्ते यांनी आज माझी संगमनेर तालुका युवक काँग्रेस महासचिव पदी निवड करून जो माझ्या वर विश्वास दाखवला तो विश्वास मी भविष्यात सुद्धा जपेल असा विश्वास देतो सर्वांच्या शुभेच्छा मनापासून स्विकारतो सर्वांचे खुप खुप आभार धन्यवाद
