पेमगिरी(संगमनेर) येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश काँग्रेसच्या जिव्हारी
_”भाजप प्रवेशासंबंधी मीडियाद्वारे प्रसारित बातम्या या खऱ्याच आहेत”_ पै. दीपक चव्हाण(युवा कार्यकर्ता)
पेमगिरी / लोववेध live न्यूज
_पेमगिरी येथील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख मा.अमोल खताळ पाटील यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलेला आहे. या प्रवेशाची दखल थेट राज्यातील प्रसिद्ध माध्यमांनी घेतली असून राज्यभर या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. पण संगमनेर काँग्रेसला हा मोठा धक्का सहन न झाल्यामुळे असा कोणताही प्रवेश झालाच नाही असं सांगून धक्क्यातून बाहेर निघण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत._
_पेमगिरीच्या अनेक आजी माजी ग्रामपंचायत सदस्यांचा आणि शेकडो कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश झालेला असून काँग्रेसकडून जी सारवासारव चालू आहे त्याकडे दुर्लक्ष करा. सर्व माध्यमातील आलेल्या बातम्या या खऱ्या असून त्या खोट्याच आहेत अस सांगणं काँग्रेसने थांबवावं आणि बाकी कार्यकर्त्यांना सांभाळावं, जे नाराज कार्यकर्ते आहेत ते भाजपमध्ये येतच राहतील. कारण भाजप पक्ष सामान्य लोकांचं पक्ष आहे. ते इथे नाराज होणार नाहीत. त्यांना गावचा जो विकास हवा आहे तो महायुती सरकार, उपमुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि मा.ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून होतच राहील._
*_पेमगिरी येथील शेकडो कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशाचा प्रत्यक्ष साक्षीदार आपला विश्वासू – पै. दीपक चव्हाण_*