पेमगिरीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केलेल्या नाही

प्रसिद्धी माध्यमांमधून चुकीच्या बातम्या

पेमगिरीच्या सरपंच सौ. द्वारका दुबे

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

-काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी गावोगावी खूप विकास कामे केली आहेत. पेमगिरीचे सर्व ग्रामस्थ व पदाधिकारी काँग्रेस पक्षातच आहे मात्र काही प्रसार माध्यमांनी चुकीच्या बातम्या पसरवले असून बळजबरीने भाजपने चालवलेला हा खोटा प्रचार असल्याची टीका पेमगिरीच्या सरपंच सौ द्वारकाताई ज्ञानेश्वर डूबे यांनी दिली आहे.

काही प्रसार माध्यमांमध्ये पेमगिरीच्या सरपंच यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या झळकल्या त्यावर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया देताना सरपंच द्वारकाबाई दुबे म्हणाल्या की, भाजपचे लोक खोटारडे आहेत. सकाळी कोणीतरी पदाधिकारी गावात आले आणि बळच लोकांच्या अंगावर भाजपचे उपरणे टाकत होते अनेकांना माहीत पण नाही की हे काय करणार आहेत असे फसवणूक करणारे भाजपचे लोक आहेत आणि मी तर त्या ठिकाणी नव्हते तरी माझे नाव आले.

आमचे गाव हे आमदार बाळासाहेब थोरात यांच्याच पाठीशी भक्कमपणे उभे आहे. ते सातत्याने गोरगरिबांचे काम करतात आमचे प्रश्न सोडवतात ज्यांना आमचं गाव कधी माहीत नव्हतं ते लोक सकाळी गावात आले. खरे तर त्यांनी गावात यावं सगळ्यांच्या समोर सांगावं चुकीचे व्हिडिओ काढायचे आणि चुकीच्या पद्धतीने बातम्या प्रसिद्ध करायच्या हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपबरोबर गावातील कुणीही नसल्याची ही त्यांनी सांगितले

तर सोमनाथ गोडसे म्हणाले की, प्रत्येक गावामध्ये सकाळी शंभर दीडशे लोक चहा पिण्यासाठी असतात. कोण आले आणि कशासाठी हा उद्योग आहे कुणाच्याही लक्षात आले नाही त्यामध्ये दोघांनी प्रवेश केला मात्र बाकीच्यांची बरेच नाव टाकली गेली कोणीही भाजपमध्ये गेलेले नाही सर्व लोक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. अशा दुर्दैवी बातम्या पसरवणे ही भाजपाची सवय असून त्यांची कीव येते असे ते म्हणाले. या प्रसंगी गावातील नागरिकांनी अत्यंत तिखट प्रक्रिया देऊन भाजपातील कार्यकर्त्यांना खोटारडे म्हणून हिणवले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!