साकूर येथे आलेल्या दिंडीचे स्वागत विजयकुमार कपिले यांनी केले.
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील साकूर येथे श्री संत ब्रह्मली नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि हरिभक्त परायण संजय महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी सोहळा सुरू असून, श्री शेत्र बहुर ते श्री क्षेत्र आळंदी अशी पायी दिंडी साकुर या ठिकाणी आली होती. . तसेच अनेक वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते.
यावेळी या दिंडीचे स्वागत श्री साई ज्वेलर्स प्रोप्रायटर विजयकुमार कपिले यांनी केले, यावेळी सर्व दिंडीकरांना जेवण तसेच फराळाची व्यवस्था देखील विजयकुमार कपिले यांनी केली.
साकूर येथे आलेल्या भव्य दिव्य दिंडीमध्ये सहभागी होऊन, वारकऱ्यांसोबत दिंडीचा आनंद विजयकुमार कपिले यांनी घेतला. तर दिंडीचे स्वागत चांगल्या प्रकारे केल्याबद्दल त्यांचे आभार हरिभक्त परायण संजय महाराज जगताप यांनी मानले आहे
तर सर्व गोरगरीब शेतकऱ्यांना सुखी राहू दे अशी देखील प्रार्थना विठुराया चरणी विजयकुमार कपिले यांनी केली आहे.
