मुख्याध्यापक राजु रामचंद्र गायकवाड यांनी शिक्षकी पेशा हा नोकरी म्हणून न करता ते एक व्रत आहे, या भावनेने स्वीकारला.- रणजितसिंह देशमुख
सेवापूर्ती गौरव समारंभ म्हणजे केलेल्या प्रामाणिक सेवेचा गौरव आहे
संगमनेर / लोकवेध live न्यूज
शिक्षक आजीवन शिक्षक असतो तो कधीही माजी होत नाही, फक्त शासकीय नियमाने तो सेवानिवृत्त होत असतो, केवळ शाब्दिक उपदेशातून नव्हे तर शिक्षकांच्या आचरणातून विद्यार्थी घडत असतात. मुख्याध्यापक राजु गायकवाड यांनी स्वतःच्या आदर्श आचरणातून शिक्षण विद्यार्थ्यांना दिले.शिक्षकी पेशा हा नोकरी म्हणून न करता ते एक व्रत आहे, या भावनेने स्वीकारला. असे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले
संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील उपक्रमशील, निसर्गप्रेमी, उत्तम संघटक, मुख्याध्यापक राजु गायकवाड यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ मल्हारराव होळकर विद्यालय अंभोरे येथे पार पडला.
गायकवाड सर हे मूळचे संगमनेर तालुक्यातील माळेगाव हवेली येथील रहिवासी त्यांनी एकूण ३३ वर्षे सेवा केली त्यात मुख्याध्यापक म्हणून दहा वर्ष सेवा बजावली.
यावेळी प्रमुख पाहुणे राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या शुभहस्ते यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच नवीन मुख्याध्यापक शिवाजी सोसे सर यांचाही सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख हे होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहादू खेमनर हे होते.
तर प्रमुख उपस्थितीत रावसाहेब खेमनर शिवराम खेमनर सोपान खेमनर भागवत खेमनर उपसरपंच किसन खेमनर तुळशीराम मलगुंडे तुळशीराम वैराळ, जावई किशोर वैराळ अशोक त्रिभुवन कदम पाटील शीला वडमोर मुलगा अमित गायकवाड मुलगा सुमित गायकवाड सून स्वप्नाली गायकवाड मुलगी शुभांगी किशोर वैराळ वाल्मीक खेमनर रावजी खेमनर लहानु खेमनर बबन खेमनर हौशीराम वाघमोडे बाबुराव जगनर ज्ञानदेव खेमनर विठ्ठल नाना खेमनर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सेवापुर्ती गौरव समारंभ संपन्न झाला
पुढे देशमुख म्हणाले की एक निसर्गप्रेमी उपक्रमशील शिक्षक, उत्तम व्याख्याते , कुटुंबवत्सल नागरिक, दिलदार मित्र अनेक समाज उपयोगी उपक्रम तसेच धार्मिकतेची आवड असलेल्या गायकवाड सरांनी आपल्या आजपर्यंतच्या सेवा काळामध्ये उत्तमरित्या बजावलेल्या आहेत. याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नेहमीच झाला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये गुंजाळ सर यांनी गायकवाड सरांचा जीवनपट सांगितला.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रियदर्शनी गवारे मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन कडनर सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्हारराव होळकर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तम नियोजन केले होते. या कार्यक्रमास मित्रपरिवार शिक्षक मुख्याध्यापक अधिकारी वर्ग आजी-माजी विद्यार्थी पालक पंचक्रोशीतील ग्रामस्थ शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
