जोर्वे येथे गॉड्स असेंबल मिनिस्ट्री संस्थेच्या वतीने मोफत ट्युशन क्लास चे उदघाटन
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
गॉड्स असेंबल मिनिस्ट्री संस्थे अंतर्गत जोर्वे या गावात फ्री ट्युशन क्लास चे उदघाटन जोर्वे गावच्या सामाजिक कार्यकर्त्यां मिनाक्षी ताई थोरात व गॉड्स असेंबल मिनिस्ट्री संस्थेच्या अध्यक्षा उज्वलाताई जगताप, कनोली गावचे सामाजिक कार्यकर्ते मच्छिन्द्र जगताप सर यांच्या हस्ते करण्यात आले.
विशाल पंडित सर यांनी फ्री ट्युशन क्लासची माहिती दिली, सोमवार ते शुक्रवार या सहा दिवसात रोज दोन तास आहे , त्यापैकी 1 तास खेळ आणि एक तास अभ्यास आहे , आज काल मुलं मोबाईल मध्ये व्यस्त झाली आहेत त्यांना त्यापासून बौद्धिक, शारीरिक वाढी साठी मुलांनी एकत्र येऊन मैदानी खेळ खेळणे गरजेचं आहे हे चित्र सद्या हरवलं आहे ते पुन्हा दिसावं यासाठी हा उपक्रम खूप महत्वाचा आहे.
सामाजिक कार्यकर्त्यां मिनाक्षी ताई बोलल्या की खूप छान उपक्रम जोर्वे गावात सुरु झाला आहे, लेकरं ही आपल्या देशाची संपत्ती आहे ती जपली पाहिजे, त्यांना सक्षम बनवणे काळाची गरज आहे, गॉड्स असेंबल मिनिस्ट्री द्वारे कौतुकास्पद उपक्रम सुरु आहे जोर्वे गावातर्फे संस्थेचे व सर्व उपस्थित मान्यवऱ्याचे स्वागत आणि शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी मुलांसाठी विविध मैदानी खेळणी वाटप करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते मच्छिन्द्र जगताप सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.
