मी कोणत्याही क्षणी कार्यालयात येऊ शकतो- आ खताळ
संगमनेर पंचायत समिती अमोल खताळ यांनी घेतला खातेनिहाय आढावा
संगमनेर / लोकवेध live न्यूज
मी कोणत्याही क्षणी कुठल्याही विभागात किंवा कुठल्याही अंगणवाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र पशुवैद्यकीय केंद्र यास इतर कुठल्याही ठिकाणी कधीही येऊ शकतो जर त्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी जागेवर सापडले नाही तर त्यांची गय केली जाणार नाही अशी तंबी संगमनेरचे नूतन आमदार अमोल खताळ पाटील यांनी पंचायत समितीच्या सर्व विभाग प्रमुखांना दिली
संगमनेर विधानसभेच्या आमदारपदी निवड झाल्यानंतर प्रथमच आ अमोल खताळ पाटील यांनी संगमनेर पंचायत समितीला भेट घेत अधिकार्याशी विकास कामांच्या संदर्भात चर्चा केली यावेळी आमदार खताळ पाटील यांचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी स्वागत केले त्यांच्या समवेत माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा यांचे जनसंपर्क अधिकारी प्रमोद राहणे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे यांच्यासह पंचायत समि तीच्या विविध खात्याचे विभाग प्रमुख उपस्थित होते
आमदार अमोल खताळ यांनी पंचायत समितीच्या विभागानुसार प्रत्येक खात्या तील घरकुलाची किती कामे पूर्ण झाली रस्त्यांची कामे कुठे बाकी आहे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामे कशी सुरू आहेत अंगणवाडीच्या इमारती किती तयार आहेत आणि किती तयार करायचे आहेत असे एकामागे एक प्रश्न विचारले मात्र तेवढ्याच समर्पकपणे अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी सर्व विभागाचा धावता आढावा आ खताळ यांना दिला मी पंचायत समितीत आगार तालुक्यातील कुठल्याही शासकीय कार्या लयात कधीही जाऊ शकतो जर मला कार्यालयामध्ये अधिकारी आगर कर्मचारी सापडले नाही तर त्यांची अजि बात गय केली जाणार नाही मला कामात हलगर्जी पणा नको आहे पंचायत समितीत येणा ऱ्या प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे काम झाले पाहिजे कोणाचे काम आडता कामा नये अशा सक्त सूचना आ खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या
येथून मागे तुम्हाला यशोधन कार्यालयातून आलेल्या लोकांची कामे करण्याची सवय होती आता ती सवय तुम्हाला बदलावी लागणार आहे येथून पुढील काळात यशोधन वगैरे काही चालणार नाही आमदार कार्यालयाकडूनच आलेल्या सूचनानुसार सर्वसामान्य जनतेचे कामे तुम्हाला करायचे आहे मतदार संघातील सर्वसामान्य लोकांचे कुठलेच काम आडले जाणार नाही याची प्रत्येक अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी
आमदार अमोल खताळ
संगमनेर विधानसभा
