नांदुरी दुमाला ग्रामपंचायतीवर फडकला महायुतीचा भगवा ; सरपंचपदी महायुतीचे निखिल निळे यांची निवड
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पश्चिम पट्ट्यातील नांदुरी दुमाला ग्रामपंचायती च्या सरपंचपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ आणि माजी सरपंच ऍड मिनानाथ शेळके समर्थक निखिल प्रमोद निळे यांचीसरपंचपदी सर्वानुमते निवड झाली आहे त्यामुळे नांदुरी दुमाला ग्राम पंचायती वर अखेर महायुतीचा भगवा फडकला आहे
नांदुरी दुमाला ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना मीनानाथ शेळके यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ॲड मिनानाथ शेळके हे काँग्रेस सोडून माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये दाखल झाले होते. या ग्रामपंचायतीवरती अनेक वर्षापासून त्यांचेच वर्चस्व होते उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना महा युतीचे आ अमोल खताळ माजी सरपंच ऍड मीनानाथ शेळके यांचे मार्गदर्शना खाली ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदासाठी महायुतीकडून निखिल प्रमोद निळे तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात समर्थक काँग्रेस कडून किसन कवडे या दोघांनी उमेदवारी दाखल केली होती
सरपंच पदासाठी निळे आणि कवडे यांच्यात मतदान प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत महायुतीचे निखिल निळे यांना ६ तर काँग्रेसचे किसन कवडे यांना ५मते मिळाली त्यानंतर निवडणूक निर्णय आधिकारी ज्योती ससे यांनी निखिल निळे यांची सरपंचपदी निवड झाली असल्याचे जाहीर केले त्यांना सहाय्य म्हणून ग्रामसेवक अशोक गुंजाळ यांनी काम पाहिले त्यानंतर माजी सरपंच सौ अर्चना शेळके ऍड मीनानाथ शेळके महा युतीचे नेते सोमनाथ नेहेया व उपसरपंच सोनबा पथवे यांनी नवनिर्वाचित सरपंच निळे यांचा सत्कार केला . अखेर या ग्राम पंचायतीत सरपंच महायुतीचा झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे नूतन सरपंच निखिल इंगळे यांचे माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे माजी खासदार डॉ सुजय विखे आमदार अमोल खताळ यांच्यासह महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
महायुतीचे अमोल खताळ यांची संगमनेर विधानसभेवर आमदारपदी निवड झाली त्यानंतर प्रथमच संगमनेर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्व पूर्ण समजली जाणारी तसेच अनेक वर्षा पासून काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली नांदुरी दुमाला ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारे महायुतीच्या ताब्यात जाऊनच द्यायची नाही यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी ग्रामपंचायत सदस्यांवर दबाव आणला होता परंतु त्या दबावाला झुगारून देत सर्व सदस्यांनी आ अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी सरपंच ऍड मिनानाथ शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यामध्ये न जाऊ देता महायुतीच्याच ताब्यात ठेवत भगवा फडकविण्यात यशस्वी झाले आहे
