मुंबईतील चैत्यभूमीवर आ अमोल खताळ यांनी केले डॉ आंबेडकरांना अभिवादन

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना
संगमनेचे महायुतीचे आ अमोल खताळ यांनी अभिवादन करत आशीर्वाद घेतले
संगमनेर चे आमदार अमोल खताळ हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधी साठी मुंबईला गेलेले आहे अद्यापआमदार पदाचा शपथविधी झालेला नाही त्यामुळे ते मुंबईतच थांबून आहे त्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरि निर्वाण दिनाच्या निमित्ताने दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन डॉ आंबेडकर यांच्या स्मृतीवर नतमस्तक होत नम्र अभिवादन करत आशीर्वाद घेतला यावेळी आमदार खताळ यांचा भारतरत्न.डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे,
यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तक देवून सन्मान केला. याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर प्रवक्ता डॉ राजू वाघमारे तसेच समन्वय समितीचे.प्रतिक कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!