साकुर पठार भागातील पाण्याचा प्रश्न पाच वर्षाच्या आत सोडवणार-आ खताळ

वरवंडीच्या दत्तगिरी महाराजांच्या फिरत्या नारळी सप्ताह आमदार खताळांची भेट

संगमनेर : लोकवेध live न्यूज 

ज्यांना चाळीस वर्षात या साकुर पठार भागातील पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही तो पाण्याचा प्रश्न आपण पाच वर्षा च्या आतच सोडून हा भाग सुजलाम सुफ लाम करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचा विश्वास आ अमोल खताळ यांनी व्यक्त केला
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील ब्रह्मालीन माणिकगिरी महाराज व साकुर चे बिरोबा महाराज यांच्या कृपशीर्वादाने साकुर परिसरात सुरू असणाऱ्या यांच्या फिरत्या नारळी सप्ताहला आ अमोल खताळ यांनी भेट दिली त्यावेळी माध्य मांशी बोलताना ते म्हणाले की साकुर पठार भागातील अनेक प्रश्न गेली ४० वर्षापासून जाणून बुजून राजकारणासाठी त्यांनी अनेक मूलभूत समस्या प्रलंबित ठेवल्या होत्या.मात्र विधानसभा निकाला नंतर त्या आता खऱ्या अर्थाने सुटण्यास मदत होणार आहे.या साकुर परिसरातील वाड्या वस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वतः अधिकाऱ्यां च्या समवेत दोन ते तीन बैठका घेतल्या असून हा प्रश्न पाच वर्षाच्या आत सोडवि ण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आ खताळ यांनी सांगितले
आपण निवडणुक प्रचाराच्यावेळी मी स्वतःआमदार होणार नाही तर तुम्ही सर्व जण आमदार होणार आहे त्यामुळे या पठार भागातील सर्वसामान्य जनता आ आहे त्या सर्वांना बरोबर घेऊन या पठार भागाचा चाळीस वर्षापासून रखडलेला विकास करायचा आहे आपल्याला इथून पुढे पक्षीय राजकारण न करताविकासाचे राजकारण करायचे आहे आणि या पठार भागातील सर्व जनतेला बरोबर घेऊन पाण्याचा व युवकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले
आपण प्रत्येक मंदिरात गेल्यानंतर त्या मंदिराच्या पायरीवर माथा टेकवत नत मस्तक होत असतो हा आपल्यावर जो संस्कार केला आहे तो संस्कार टिकला पाहिजे तसेच मला ज्या जनतेने भरभरून मते देऊन त्यांचा प्रतिनिधी म्हणून विधान सभेत सेवा करण्यासाठी पाठवले आहे त्याच प्रमाणे विधानभवन हे माझ्यासाठी पवित्र मंदिर आहे म्हणून आपण यापवित्र मंदिराच्या पायरीवर माथा टेकूनच विधान सभेत प्रवेश केला असल्याचे आ खताळ यांनी सांगितले यावेळी त्यांच्या समवेत वरवंडी येथील उमरेश्वर आश्रमाचे प्रमुख दत्तगिरी महाराज साकुर पठार भागातील भाजप जेष्ठ नेते बाळासाहेब खेमनर युवा नेते गुलाब भोसले भाजपचे उपाध्यक्ष बुवाजी खेमनर शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ रहाणे. तालुका उपप्रमुख संदीप खिल्लारी, खांबागावचे सरपंच रवी दातिर भाजप अल्पसंख्यांकचे राज्यकार्यकारणी सदस्य रौफ शेख.ऍड अमित धुळगंड संतोष वणवे,रणजित धूळगंड अझर पटेल. अमोल सागर. रणजित ढेरंगे. दिपक खेमनर. गणेश डोंगरे. सुभाष गागरे. बाळासाहेब खेमनर. संतोष शेटे. सद्दाम चौगुले. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी नूतन आमदारपदी निवड झाल्या बद्दल फिरत्या नारळी सप्ताहात आमदार अमोल खताळ यांचा महंत काशिनाथदास महाराज पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!