पाण्याची अजिबात काळजी करू नका
;आ खताळ
काकडवाडीच्या अखंड हरिनाम सप्ताह आमदार अमोल खताळ यांची भेट

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

ज्यांना चाळीस वर्षात या भागासाठी काही करता आलं नाही ते आपण पाच वर्षाच्या आत करून दाखवणार आहे तुमच्या या भागात पाणी नाही त्यामुळे तुम्ही आता पाण्याची काळजी करू नका
या भागाला पाणी मिळून देत हा भाग सुजलाम सुफलाम करणार असल्याचा विश्वास संगमनेरचे आ अमोल खताळ यांनी व्यक्त केला
संगमनेर तालुक्यातील काकडवाडीच्या महालक्ष्मी मंदिर येथे सुरू असणार्या या अखंड हरिनाम सप्ताह संगमनेरचे महा युतीचे आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली त्यावेळी बोलताना ते म्हणाले की काकडवाडीच्या महालक्ष्मी मातेच्यादर्शना साठी अनेक वेळा आलो आहे महालक्ष्मी माता नवसाला पावणारी आहे. त्यामुळे अनेकांचे नवस या मातेने आतापर्यंत फेडले आहे असे सांगून आमदार खताळ म्हणाले की दिवसेंदिवस अखंड हरिनाम सप्ताहकडे तरुणांचा ओढा कमी होत चालला आहे परंतु सद्यस्थितीला सप्ताह मध्ये अनेक तरुण महाराज आपल्या धर्माविषयी प्रबोधन करत आहे त्यामुळे तरुणांचा ओढा पुन्हा या सप्ताहाकडे वाढतचालला असल्याचे त्यांनी सांगितले
सप्ताह कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब महाराज झुरळे म्हणाले की संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती शुद्ध करण्यासाठी तीनशे वर्ष वाट पहावी लागली आणि संत एकनाथ महाराजांनी ती ज्ञानेश्वरी शुद्ध केली तसे या तालुक्यात परिवर्तन होण्यासाठी काहींनी तर ४० वर्ष
दाढ्या राखाव्या लागल्या आहेत आणि तो आनंदाचा क्षण अमोल खताळ यांच्या रूपाने तालुक्यामध्ये परिवर्तन करून आपणा सर्वांना पाहायला मिळाला आहे हे तुम्हा आम्हा सर्वांचे भाग्य असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.सप्ताह कमिटी च्या वतीने आमदार अमोल खताळ यांचे भाऊसाहेब महाराज झुरळे यांनी स्वागत केले तर पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी आभार मानले.यावेळी अभिजीतमहाराज गिरी,महालक्ष्मी देवस्थानचे भगत संतोष झुरळे,, गोकुळ गायकवाड,योगेश मुळे, पोलीस योगेश ढवळे अर्जुन शिरसाठ ,सतीश मुळे,दिनेश मुळे,सोमनाथ मुळे राजाराम मुळे,बबन काळे,गणेश काळे, बस्तिराम मुळे,मेजर बबन शिरसाठ,सुदाम काळे,नानासाहेब गायकवाड,आकाश माळी,अनिल माळी सहित पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!