जोर्वे नाका ते बसस्थानक रस्त्यावरीलसर्व अतिक्रमणे काढा

जोर्वेच्या माजी सरपंचसह ग्रामस्थांनी आ अमोल खताळ व पोलीस प्रशासनाला घातले साकडे

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

शहरातील जोर्वे नाका ते बसस्थानक, दिल्ली नाका ते पंचायत समिती रस्त्यावर अतिक्रमणामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो आहे.या भागात असणारे अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावीत या मागणीचे निवेदन सरपंच तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष गोकुळ दिघे यांनी आ अमोल खताळ यांना देत मागणी केली आहे
संगमनेर शहरातील जोर्वे नाका ते बस स्थानक, दिल्ली नाका ते पंचायत समिती रस्त्यावर मोठी वाहने, हातगाड्या व रिक्षा कुठलीही परवानगी नसताना अस्तव्यस्त स्वरूपात उभ्या केलेल्या जात असतात. त्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. याचा पुणे नाशिक मार्गाने येणार्या वाहनचालकांसह नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो.अनेकवेळा या तून वादावादीचे प्रकार सुद्धा घडलेआहे त्यामुळे या दोन्ही रस्त्यांवर होत असलेले अतिक्रमण प्रशासनाने काढून या भागा तील नागरिकांचा श्‍वास मोकळा करावा, अशी मागणी जोर्वेचे माजी सरपंचगोकुळ दिघे, संपत राक्षे, रवींद्र गाडेकर, गणेश काकड,अमोल दिघे, हरिष काकड ,सचिन दिघे,कृष्णा इंगळे, प्रमोद दिघे, शांताराम दिघे, सौरभ जाधव, नंदू थोरात, जगन इंगळे, रमेश इंगळे, बंडू इंगळे आदिंनी संगमनेर चे आमदार अमोल खताळ आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याकडे केली आहे केली आहे

पुणे रस्त्यावरील जोर्वे नाका परिसरात रस्त्यामध्ये विनाकारण उभ्या असलेल्या गाड्या हातगाड्या रिक्षा याचावाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे याअतिक्रमना बाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर जोर्वे ग्रामस्थ आंदोलन करतील यानंतर होणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची दक्षता घ्यावी
श्री गोकुळ दिघे
माजी सरपंच जोर्वे तथा भाजप तालुका उपाध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!