थंडीपासून संरक्षण करण्यासाठी दे.ना. गोडगे प्रतिष्ठान यांच्यावतीने ब्लॅंकेट चे मोफत वाटप “

तळेगाव दिघे / लोकवेध live न्यूज 


थंडीपासून संरक्षण करण्यासाठी निराधार व गरजू लोकांना दे.ना गोडगे प्रतिष्ठान तळेगाव दिघे यांच्यावतीने परिसरातील गरजू व्यक्तींना तळेगाव दिघे ता. संगमनेर येथे डॉ.गोडगे हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये मोफत बँकेचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. चिंचोली गुरव येथील महेश किसन सोनवणे यांची कनिष्ठ लिपिक जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर इथे निवड झाली तसेच प्रतीक्षा केशव भागवत यांची संभाजीनगर कारागृह पोलीस पदी नेमणूक झाली व प्रतीक आबासाहेब भागवत यांची इंडियन एअर फोर्स मध्ये नेमणूक झाल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने गुणगौरव करून येतोचित सन्मान सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. प्रतिष्ठानचे सर्वे सर्व आदरणीय श्री देवराम दादा नारायण गोडगे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री हरिभाऊ दिघे सर,युवा कीर्तनकार अरुण महाराज दिघे, ग्रा. सदस्य. आबासाहेब भागवत,अतुल कदम राजू भाऊ दिघे, मेजर राजू गुंजाळ सागर कारले प्रकाश दिघे शिवाजी देवराम गोडगे,सरपंच माझा चैनल चे रामनाथजी बोराडे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशोक जगताप सर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले तर सूत्रसंचालन जनसंवाद चॅनलचे अध्यक्ष दत्ताभाऊ घोलप यांनी केले आभार साईबाबा हॉस्पिटल चे संचालक डॉ. नंदकुमार गोडगे यांनी मानले. शंभरहून अधिक नागरिकांना बँकेचे वाटप करण्यात आले कडाक्याच्या थंडीमध्ये उद्धार ब्लॅंकेट मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!