टाकळी शाळेत व्यवस्थापन अध्यक्ष बाळासाहेब फोडसे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

टाकळी अकोले / लोकवेध live न्यूज 

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळी येथे शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्री. बाळासाहेब फोडसे उर्फ मामा यांचा ७१ वा वाढदिवस शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री.बाळू मामांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना जिलेबीचे मिष्टान्न भोजन देवून शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व व्यवस्थापन समिती सदस्यांकडून मामांचा विशेष अभिष्टचिंतन सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी व्यवस्थापन समितीचे कर्तृत्ववान शिक्षणप्रेमी अध्यक्ष मा. श्री.बाळासाहेब फोडसे यांना शाळेतर्फे ७१ व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! मामाश्री तुम जियो हजारो साल…साल के दिन हो पच्चास हजार !! अभिष्टचिंतन सोहळ्यास शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार, संजय देशमुख, दत्तात्रय देवगिरे व संजय शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!