जिल्हा परिषद शाळा टाकळी येथे सावित्रीबाई फुले जयंती तथा बालिका दिन जल्लोषात साजरा

टाकळी अकोले / लोकवेध live न्यूज 

 

दि. ३ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा टाकळी येथे स्त्री शिक्षणाच्या अग्रणी, आद्य शिक्षिका, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती अर्थातच महिला मुक्ती दिन तथा बालिका दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाकळी महिला बचतगट संघटनेच्या प्रवर्तक मा. शोभाताई भरीतकर होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापनचे अध्यक्ष मा. बाळासाहेब फोडसे, आरोग्य केंद्राच्या डॉ. उज्ज्वला वैद्य, लिडर माता श्रीमती सविता गाडे,कमल चासकर, सुरेखा घोलप, रोहिणी पवार, पद्मावती सुर्वे इ. उपस्थित होते. यावेळी टाकळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर “बालिका दिन” ही हिदी नाटिका सादर केली. त्यास उपस्थित मान्यवरांनी भरभरून दाद दिली. प्रस्तुत कार्यक्रमात टाकळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार, सहकारी शिक्षक श्री. दत्तात्रय देवगिरे, संजय देशमुख व संजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील फुले दांपत्याच्या अनमोल योगदानाविषयी मार्गदर्शन केले. याशिवाय व्यवस्थापन सदस्य रोहिणी पवार, पद्मावती सुर्वे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतातून मा. शोभाताई भरीतकर यांनी मुलींना शिक्षणाचे व स्वसंरक्षणासाठी सज्ज होण्याचे महत्त्व विशद केले‌. यावेळी माता पालक संघाच्या ज्येष्ठ महिला सदस्य मा. पद्मावती सुर्वे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना राजगिरा लाडूचा खाऊ वाटप केला‌. त्यांचा शाळेकडून यथोचित सत्कार करण्यात आला‌. या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय देशमुख यांनी केले तर आभार श्री. संजय शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!