रयतच्या शैक्षणिक कार्यात कॉ. पी.बी.कडू पाटलांचा मोलाचा वाटा- चंद्रकांत दळवी

निमगाव जाळी, / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी 

रयत संकुल, सात्रळ ता.राहुरी जि.अहिल्यानगर येथे कॉ.पी.बी.कडू पाटील “समाजक्रांती पुरस्कार सोहळा ” मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक वितरण समारंभ तसेच श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालय इमारत भूमिपूजन समारंभ,रयत संकुल सात्रळ येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युवानेते पंकज कडू पा.यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यानंतर राज्य पातळीवर शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक व पुरोगामी चळवळीत उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा कॉ.पी.बी.कडू पाटील समाजक्रांती पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या शुभहस्ते खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांनी स्वीकारला . *कन्या शाळेच्या इमारत बांधकामासाठी रामशेठ ठाकूर यांनी 50लाखाची व महेंद्र शेठ घरत यांनी 25 लाखाची देणगी प्रदान यावेळी केली* यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते. मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक वितरण संपन्न झाला यामध्ये कृतिशील मुख्याध्यापक पुरस्कार देवढे नंदकुमार एकनाथ,कर्मवीर भाऊरावपाटील,विद्यालय, विंचूर जि.नाशिक .. उपक्रमशील शिक्षक पुरस्कार,दिवे बापू सहादू,महात्मा फुले विद्यालय,जानोरी ता. दिंडोरी जि.नाशिक …सावित्रीबाई फुले शिक्षिका पुरस्कार श्रीमती शेलार विजया दिलीप,छत्रपती शिवाजी विद्यालय,बेलवंडी,जि. अहिल्यानगर, स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगर यांना प्रदान करण्यात आला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना रयत शिक्षण संस्थेचे *चेअरमन व माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी* यांनी सांगितले की अहमदनगर जिल्ह्यामध्ये रयतचा जेवढा विस्तार व विकास झाला याचे सर्व श्रेय कॉ.पी.बी कडू पाटील व अरुण कडू पाटील यांना जाते 70 वर्षाच्या या भागातील सहकार व रयतच्या शैक्षणिक प्रगतीत आप्पांचा फार मोलाचा वाटा आहे. दानशूर रामशेठ ठाकूर यांना दिला जाणारा समाज क्रांती पुरस्कार हा रामशेठ ठाकूर यांच्या कार्यामुळे या पुरस्काराची उंची टिकून आहे. एक रयत सेवक ते यशस्वी उद्योजक हा ठाकूर यांचा थक्क करणारा जीवन प्रवास निश्चितच सर्वांना प्रेरणा देणारा आहे. रतच्या कार्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की शिक्षणामध्ये आधुनिकता आणण्यास रयत शिक्षण संस्था सक्षम आहे जगातील नवीन तंत्रज्ञानाचा रयतमध्ये अवलंब करण्यात येत आहे याबाबत येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाईल संस्थेचे यश हे सर्वांचे सांघिक यश असते. रयत सेवक हा रयत शिक्षण संस्थेचा कणा आहे. निरपेक्ष भावनेने काम करणारे अरुण कडू पाटील यांच्या कार्याचाही यावेळी त्यांनी गौरव केला. पुरस्कार प्राप्त सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. *रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत* यांनी रामशेठ ठाकूर यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला एक रयत सेवक ते यशस्वी उद्योजक हा ठाकूर यांचा प्रवास वाखाणण्याजोगा व आहे रामशेठ ठाकूर यांनी कधीही तत्वाशी प्रतारणा केली नाही मी रयतमुळे घडलो प्रतिकूल परिस्थितीतही कर्मवीर अण्णांचे,शाहू ,फुले, आंबेडकरांचे संस्कार माझ्यावर झालेलेआहेत देव माणसात असतो हे विचार मला मिळालेले आहेत समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही भावना रामशेठ ठाकुर यांचे विचार आहे. म्हणूनच आम्ही रयतच्या विकासासाठी सर्व एकत्र असतो कार्यक्रमाच्या *अध्यक्षपदावरून बोलताना रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे* यांनी कॉ.पी.बी.कडू पाटील यांच्या कार्याची माहिती देताना सांगितले की आप्पा संपूर्ण जीवन हे कार्ल मार्क्स म्हणून जगले रयतेने चालवलेली संस्था व रयतच्या सर्व शाखा सक्षम झाल्या पाहिजे या विचारांनी आप्पा जगले. रयत शिक्षण संस्थेसाठी आप्पांचा त्याग मोठा आहे. यावेळी रमेश पुलाटे,मंगेश वडजे,हंसराज मते,अर्चना दिघे,भाऊसाहेब जाधव, पोपटराव दिघे,जगधने यांनी कॉ.पी.बी कडू पाटील फाउंडेशन ला देणगी प्रदान केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून , रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष,महेंद्रशेठ घरत, अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील,रयत शिक्षण संस्थेचे सचिव, माजीआय.ए.एस अधिकारी,विकासराव देशमुख,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के, रयतचे बांधकाम समितीचे, चेअरमन, प्रकाश पाटील निकम,कार्यक्रमास मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, माजी.सचिव शिवाजीराव भोर, रावसाहेब मस्के,वडजे बापू ,संदीप वर्पे, कृष्णागर जेजुरकर सुरेश लगड विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे निंबाळकर साहेब,नंदकुमार देवढे, कैलास बागले, बापूसाहेब काळे,टी शेळके बाबुराव उपाध्ये शिरसाट सर,साबळे सर,ॲड.अशोक बोरा,मंगेश दादा वडजे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे,सरोदे साहेब, अच्युतराव बनकर,राधाकृष्ण पूलाटे, प्राचार्य गहिनीनाथ विखे,कॉ.बाबा आरगडे प्राचार्य गागरे डॉ. पडघन प्राचार्य संजय नगरकर , समतीलाल गांधी, बाळकृष्ण होडगर पंचक्रोशीतील शिक्षक प्रेमी नागरिक व उत्तर भागातील सर्व शाखांचे शाखाप्रमुख व शिक्षक उपस्थित होते…… समारंभ यशस्वी करण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व कॉ. पी.बी.कडू पाटील फाउंडेशनचे,अध्यक्ष अरुण कडू पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी,नवनाथ बोडखे,रयत शिक्षण संस्थेचे किरण पाटील कडू, पंकज पाटील कडू,रयत संकुलचे प्राचार्य राजेंद्र बडे,कन्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक दिलीप माळी,प्रगती पतसंस्थेचे चेअरमन ॲड.विजयराव कडू पाटील,स्कूल कमिटीचे संभाजीराव चोरमुंगे पा. भाऊसाहेब पेटकर सर्व शिक्षक व सेवक आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश कडलग व विलास गभाले यांनी केले तर आभार प्रदर्शन विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!