*निमगाव जाळी वि.का.स.सोसायटीस केंद्र शासनाचा व्यवस्थापन सक्षमीकरण पुरस्कार जाहीर

 

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी 

 

निमगाव जाळी ता.संगमनेर जि.अहिल्यानगर येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव मा.शिवाजीराव जोंधळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या नियमानुसार सन 2023 24 मध्ये आर्थिक खर्चात काटकसर करून सभासदांच्या हिताची जपणूक करुन व्यवस्थापन केल्याबद्दल व सेवा सोसायटीस प्रगती पथावर नेल्याबद्दल केंद्र शासनाच्या वतीने संस्थेस *व्यवस्थापन सक्षमीकरण पुरस्कार 2023-24* जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळविण्यासाठी. संस्थेचे चेअरमन तुकाराम जोंधळे, व्हा.चेअरमन अरुण तांबे माजी चेअरमन ठकाजी थेटे, सर्व संचालक, मॅनेजर भाऊसाहेब तांबे,कर्मचारी, कैलास थेटे,जालिंदर कडलग यांनी परिश्रम घेतले, पुरस्कार मिळाल्याबद्दल मा. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा.मा.खा. सुजयदादा विखे,मा. जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे,निमगाव जाळी येथील सर्व संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!