अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (भ.वि. विभाग) तालुका अध्यक्षपदी संजय फुलसुंदर यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस (भ.वि.विभाग) अकोले तालुका अध्यक्ष संजय फुलसुदर यांचा आमदार लहामटेंकडून सत्कार!

अकोले / लोकवेध live न्यूज 

-अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (भटके विमुक्त विभाग) अकोले तालुका अध्यक्षपदी संजय रामचंद्र फुलसुंदर यांची निवड करण्यात आल्याने संजय फुलसुदर यांचा अकोल्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांनी सत्कार केला

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (भटके विमुक्त विभाग) अकोले तालुका अध्यक्षपदी कोतुळ येथील युवक कार्यकर्ते संजय रामचंद्र फुलसुंदर यांची नियुक्ती करण्यात आली आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( भटके विमुक्त विभाग) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड यांनी नुकतीच ही निवड करण्यात आल्याचे जाहीर केले श्री संजय फुलसुंदर यांचे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून त्यांची ही निवड केली आहे

युवक कार्यकर्ते संजय फुलसुंदर यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन व स्वागत करण्यात येत असून अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे, यांनी श्री फुलसुंदर यांचा सत्कार करून कामाला शुभेच्या दिल्या
त्यांच्या निवडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (भटके विमुक्त विभाग) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड
,प्रदेश उपाध्यक्ष अंबादास धनगर, प्रदेश सरचिटणी त्रिशा मढेवार ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगर जिल्हाअध्यक्ष कपिल पवार ,ज्येष्ठ नेते व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सिताराम पाटील गायकर आदींनी श्री संजय फुलसुंदर यांचे अभिनंदन केले आहे यांनी अभिनंदन केले आहे
राज्यात महायुतीचे सरकार असून राज्य सरकारच्या विविध योजना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठांचे मार्गदर्शना खाली पक्षाचे विचार आणि ध्येयधोरण सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्याचे व या पुढील काळात पक्ष वाढीसाठी जोमाने काम केले जाईल असे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय फुलसुंदर यांनी सांगितले
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!