दोन दिवसात विजेचा लपंडाव बंद करा अन्यथा, जोर्वे पिंपरणे ग्रामस्थ संगमनेर महावितरण कंपनी समोर उपोषण करणार.
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील जोर्वे पिंपरणे गेली पंधरा दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पिके जळून चालले आहेत लाईटची वेळोवेळी झटके मारणे तसेच तासन तास लाईट बंद असते व त्यानंतर अचानक विज आल्यानंतर ओव्हर लोड मुळे विजेची उपकरणे जळत आहे शेतीला पाणी भरणे मुश्किल झाले असल्यामुळे रात्री अपरात्री कधीही लाईट येते जाते त्यात रात्रीची बिबट्याची भीती शेतकऱ्यांनी करायचे तरी काय असा सवाल शेतकरी वर्ग करत आहे त्यामुळे विजेचा खेळ खंडोबा सुरळीत होण्यासाठी जोर्वे पिंपरणे ग्रामस्थांनी संगमनेर कार्यकारी अभियंता महावितरण कंपनी यांना निवेदन दिले आहे दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही संगमनेर महावितरण कंपनी समोर उपोषण करू असा इशारा दिला आहे
या निवेदनात असे म्हटले आहे की
गेल्या मागील 15 दिवसांपासुन मौजे जोर्वे, पिंपरणे ता. संगमनेर येथील विज वितरण व्यवस्था ही पुर्ण पणे कोलमंडलेली आहे रात्री अपरात्री बिबट्याचा मोठ्या प्रमाणात उपद्रव असुन काही जीवीत हाणी झाल्यास त्यास पुर्ण पणे महावितरण कंपणी जबाबदार असेल
पधंरा दिवसापासुन दिवसभर सिंगल फेज घरगुती विज सारखे तास तास जात असतेच त्यात आता रात्री पण विज पुरवठा सुरळीत मिळत नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष असुन पुढील दोन दिवसात सिंगल फेज (घरगुती विज पुरवठा) सुरळीत नाही झाल्यास दिनांक 5-03-2025 रोजी महाविरण कार्यालय संगमनेर येथे भव्य मोर्चा काढुन जाब विचारण्यात येईल. असे निवेदन खाली सह्या करणार जोर्वे गावचे माजी सरपंच गोकुळ दिघे प्रकाश काकड सचिन दिघे रवींद्र गाडेकर प्रसाद दिघे आशुतोष चव्हाण जगदीश इंगळे जितेंद्र दिघे अक्षय दिघे बाळासाहेब दिघे सचिन इंगळे, बाळासाहेब शिवाजी थोरात अनिकेत जोर्वेकर सुनील बलसाने यांनी दिले आहे
