पिंपरणे येथे पर्यावरण पूरक होळी साजरी
पिंपरणे/ लोकवेध live न्यूज
सालाबादाप्रमाणे पिंपरणे येथे याही वर्षी देखील पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात आली. पर्यावरणाला ,झाडांना कुठल्याही प्रकारची हानी न पोहोचवता वाळलेल्या झाडाच्या फांद्या, तसेच शेणाच्या गोवऱ्या या सर्व समिधा जमा करून होळी पेटवण्यात आली
होळीचा सण अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला होळी पेटवण्याचा मान पिंपरणे गावचे पोलीस पाटील विनोद साळवे व सरपंच नारायण मरभळ यांना दिला गेला
यावेळी सरपंच नारायण मरभळ, पोलीस पाटील विनोद साळवे उत्तमनाना राहींज अजित देशमुख राहुल बागुल निलेश बागुल कल्याण जोर्वेकर संजय बागुल मंजाबापू साळवे राजू वाकचौरे गोरक्षनाथ कर्पे सुरेश गाडेकर पप्पू जोशी आदी सह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
यावेळी पोलीस पाटील विनोद साळवे सरपंच नारायण मरभळ यांच्या शुभहस्ते होळीचे पूजन करण्यात आले व प्रथेप्रमाणे जामगाव या ठिकाणची लखाईमाता देवीच्या मंदिरासमोर प्रथम होळी पेटवली जाते त्या होळीची एक ज्योत घेऊन पिंपरणे गावातील हनुमान मंदिराकडे आणले जाते तीही मध्ये कुठेही न विझता त्यानंतर या ठिकाणी होळी पेटवली जाते यावेळी लखाईमाता मंदिरापासून रितेश साळवे तरुणाने ती पेटवून आणून देण्याचे काम केले त्यानंतर सरपंच पोलीस पाटील गावातील विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होळी पेटवली गेली गावात हा सण दरवर्षी शांततामय वातावरणात आणि उत्साहाच्या वातावरणात पार पाडला जातो
