ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरुक असावे
अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर .
माढा तालुका / लोकवेध live न्यूज / हनुमंत मस्तुद
ग्राहकांना वस्तू निवडण्याचा, त्याचा दर्जा व प्रमाण जाणून घेण्याचा आणि खात्री करण्याचा अधिकारी ग्राहकांना असून, ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत नेहमी जागरुक असावे असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर व जिल्हा पुरवठा कार्यालय यांच्या वतीने जागतीक ग्राहक हक्कदिन आज जुने जिल्हाधिकारी कार्यालाय, बहुद्देशिय सभागृह येथे अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेत साजरा करण्यातआला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पाडोळे, ग्राहक तक्रार निवारण आयोग सदस्य – श्रीमती श्रध्दा बहिरट, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा प्रमुख शोभना सागर, ग्राहक समिती जिल्हाअध्यक्ष संतोष कोल्हाळ, ग्राहक समिती सदस्य राजेंद्र घाडगे, शाहिर रमेश खाडे रेशन दुकानदार -महसूल कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर म्हणाल्या, ग्राहक हा राजा आहे. राजाला सन्मानाने जगायला पाहिजे. ग्राहकाचे अधिकार इतक्या प्रमाणात आहेत की त्याचा वापर करून ग्राहक राजासारखा जगू शकतो. ग्राहकाला कायद्याने सुरक्षितता, माहिती जाणण्याचा, निवडीचा, मत मांडण्याचा, उपाययोजना करण्याचा, शिक्षणाचा, मुलभूत गरजा, निरोगी वातावरणाचा अधिकार दिला आहे. फसवणूक होवू नये यासाठी या सर्व अधिकाराचा वापर ग्राहकाने करावा असे सांगून शासनाच्या शाश्वत जीवन शैली या ग्राहकांच्या खरेदी केलेली वस्तू व ती वस्तूचा टिकण्याचा कालावधी याबाबत माहिती दिली तसेच ग्राहकांनी चिकित्सक पणे प्रश्न विचारणे , व ग्रहकांची मोठयाप्रमाणात होणारी ऑनलाईन फसवणूक, वजन मापे याबाबत मार्गदर्शन केले.
ग्राहक हक्क दिना निमित्त सरडे यांनी प्रास्ताविकात केंद्र व राज्य सरकारच्या शाश्वत जीवन शैली या कायद्या विषयी व ग्राकांची फसवणुक कशी होते ग्राकांनी फसवणूकी पासुन सावसधानता बाळगली पाहिजे , ग्राकांचे हक्क काय आहेत, व फसवणूक झाल्यास त्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समिती कडे तक्रार करण्यात बाबत मार्गदर्शन केले.
तसेच श्रीमती श्रध्दा बहिरट, यांनी ग्राहकांनी आपली फसवणुक झाल्यास ग्राहकमंचा आधार घेण्याबाबत मार्गदर्शन केले तर शोभना सागर यांनी अन्याय झालेल्या ग्राहकांना न्याय देण्याबात ,खाद्यपदार्थांची भेसळ, तसेच ग्राहक संरक्षण समितीची बैठक नियमितपणे घेऊन ग्राकांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत मार्गदर्शन करून ग्राहकांनी जागृत राहण्याबाबत मार्गदशने केले.
जागतिक ग्राहक दिना निमित्त सकाळी शंभर विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने सुरवात करण्यात आली, यामध्ये सिध्देश्वर प्रशाला व मुलींची सेवादन शाळा यांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात महाराष्ट्रशासनाच्या विविध विभागांचे स्टॉल (दालने) लावण्यात आले होते. यामध्ये जिल्हा पुरवठा विभाग, राज्य परिवहन महामंडळ, जिल्हा शल्यचिकित्सक -आरोग्यविभाग, कृषी विभाग सोलापूर, प्रादेशिक परिवहन कार्यालाय सोलापूर, पोलीस आयुक्त- शहर वाहतुक विभाग, वैध मापन शास्त्र यंत्रणा, रसायण शास्त्र प्रयोगशाळा, अन्नऔषध प्रशासन सोलापूर, महा. राज्य विद्युतवितरण कंपनी, व भारत गॅस एजन्सी आदी स्टॉलला भेट देऊन श्रीमती ठाकूर यांनी पहाणी करून माहिती घेतली.