अंभोरेत गंगापूजन निमित्त गो-माता आणि संत पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न…
संगमनेर / लोकवेध live न्यूज
राष्ट्रसंत जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज श्री.क्षेत्र दत्त पावन आश्रम,अंभोरे. येथे राष्ट्रीय अध्यक्ष,दशपंचनाम जुना आखाडा निलपर्वत त्र्यंबकेश्वर नाशिक आणि राष्ट्रीय संत सद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरिजी ) महाराज यांचे कृपापात्र शिष्य श्री.श्री.1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांचे संत सत्संग सोहळ्याचे आयोजन केले होते
अंभोरे येथिल श्री.क्षेत्र दत्त पावन आश्रमाचे मठाधिपती महंत 108 स्वामी निलकंठगिरिजी महाराज,महंत 108 स्वामी वाल्मिकगिरिजी महाराज यांचे मार्गदर्शनाखाली प्रयागराज,ओंकारेश्वर,चित्रकूट, उज्जैन,काशी,मथुरा,अयोध्या,अशी तीर्थ यात्रा यशस्वी केली. त्यानिमीत्ताने गंगा,गो-माता आणि संतपूजन कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात उत्साहात संपन्न झाला.
संत व्यासपिठावर 108 महंत स्वामी राघवश्वोर गिरी महाराज कुंभारी आश्रम,प.पु.सोमनाथ महाराज,नाटेगाव,प.पु.भुषण महाराज,प.पु.महेश महाराज प्रारंभी श्री.श्री.1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरिजी महाराज यांची सजविलेल्या रथातुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली,रंगी-बेरंगी फुलांची उधळण करीत,फटाक्याच्या आतिशबाजीत डी.जे. वरिल बाबाजींच्या भक्तिमय गिते वाजवून अंभोरे गावातील प्रवेशद्वारावर श्री.रामेश्वर (महादेव) मंदिरात विधिवत पुजा करुन गावातील प्रमुख मार्गावरील श्री.विठ्ठल-रुख्मिणी मंदीरात तसेच हनुमान मंदीर,साईबाबा मंदीर,काळुआई ,बिरोबा महाराज मंदिरात पूजन करुन जल्लोषात श्री.क्षेत्र दत्तपावन आश्रमाकडे नेण्यात आली.मिरवणूकीत महिला-युवती यांनी गंगाकलश डोक्यावरती घेउन मिरवणूकीत सहभाग नोंदवत मिरवणूकीचे आकर्षण ठरवत मिरवणूक नवचैतन्य निर्माण केले.गावातील अबालवृध्द,तरुण,युवक यांचेसह ग्रामस्थ,नागरिक,जय बाबाजी भक्त परिवार व इतरही भक्त परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाला त्यामुळे काही काळ गावातील रस्त्याचे दुतर्फा भाविकांची गर्दी झाली गावात भक्तिमय वातावरण तयार झाले होते त्यामुळे भक्तांचा उत्साह संचारला आणि सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले.अंभोरे गाव ते दत्त पावन आश्रमाकडे भक्तांचे गर्दी ओसंडू लागली. श्री.दत्त पावन आश्रमात महाराजांचे व बाबाजींचे पालखीचे विधिवत पूजन स्वामी शिवगिरीजी महाराजांचे शुभ हस्ते करण्यात आले.अंभोरे ग्रामस्थ,उपस्थित भाविकांचे वतीने उपसरपंच श्री.किसनराव खेमनर,महाराष्ट्र राज्य एस.टी.परिवहन मंडळाचे संगमनेर आगार व्यवस्थापक श्री.प्रशांत गुंड यांचे हस्ते स्वामी शिवगिरिजी महाराज यांचे पूजन आणि सन्मान करण्यात आला.उपस्थित साधु-संता व इतरही मान्यंवराचा सन्मान महंत निलकंठगिरिजी महाराज यांचे हस्ते करण्यात आला.त्यानंतर स्वामी शिगिरिजी महाराज यांचे अमृतवानीत सुश्राव्य संगितमय प्रवचन झाले.प्रवचनमनात इतके तल्लीन झाले दुपारचे दोन वाजले तरी भाविक इतके तल्लीन आणि मंत्र मुग्ध झाले की,तहान भुक हरवून गेले एकाग्र होउन प्रवचन ऐकत होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्री गणपती आणि राष्ट्र संत जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांची आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.स्वामी शिवगिरिजी महाराज यांचा संत दर्शन सोहळ्याचा उपस्थित भाविकांनी लाभ घेतला त्यावेळी एक वेगळाच आनंद प्रत्येकांच्या चेह-यावर दिसत होता.यानिमित्ताने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.उपस्थित महिला,पुरुष,युवक,युवती,बालगोपा ळांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.संगमनेर,कोल्हेवाडी,जोर् वे,वैजापुर,निफाड,धांदरफळ,हि वरगाव पावसा,शिरापूर,देवगाव,जाखोरी,पिं परणे,शेडगाव,मालुंजे,कनोली,डीग् रस,कोळवाडे,अंभोरे पंचक्रोशील स्थानिक संस्थाचे पदाधिकारी यांचेसह सामाजिक,राजकिय,धार्मिक,वारकरी संप्रदायातील मान्यंवर आणि भाविक,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी.हौशिराम वाघमोड़े.सुभाषराव हळनोर .डॉ.सोमनाथ सोर.दशरथ वर्पे सर,डॉ.नानासाहेब कोटकर,.विठोबा जानकू खेमनर.बबनराव शेरमाळे,श्रावण जगनर,अँड.शंकरराव खेमनर,अजित बाचकर,रामनाथ भारती.डॉ.प्रा.आण्णासाहेब जगनर,रमेश खेमनर,लक्ष्मण जगनर,राजु भारती,लक्ष्मण खेमनर ,आण्णा गंगा खेमनर ,भाऊसाहेब पाटोळे,भाऊ जगनर,सिताराम कडनर,कैलास कडनर,चंद्रभान कडनर,शरद जगनर,गणेश जगनर,सचिन कडनर, रभाजी वाघमोड़े,सचिन जगनर,मंगेश जगनर अदिनी विशेष परिश्रम घेतले.