श्री क्षेत्र पिंपरणे ते श्री क्षेत्र शिर्डी पायी दिंडीचे आयोजन
 पिंपरणे / लोकवेध live न्यूज
oplus_4128
सद्गुरु साईनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने  यांच्या कृपा आशिर्वादाने याही वर्षी  संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपरणे  (संगमनेर )ते  श्री क्षेत्र शिर्डी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
  साईबाबां यांच्या  कृपाआशिर्वादाने व सर्व साई भक्तांच्या प्रेरणा व भजनी मंडळ मार्गदर्शना खाली  या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले असून   सालाबाद प्रमाणे या वर्षी गुरुवार दिनांक २७/३/२०२५ ते शुक्रवार दिनांक २८/३/२०२५  या कालावधीत हा पायी दिंडी सोहळा असेल  गुरुवार दिनांक २७/३/२०२५ रोजी सकाळी  ९वा या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे  या सोहळ्याचे हे १७ वे यशस्वी वर्ष आहे करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी चे  साईबाबा हे  प्रत्येकाचे श्रद्धास्थान असून दर्शनासाठी या पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.यंदाचे हे  १७ वे वर्ष असून सालाबादप्रमाणे भाविकांनी याही वर्षी मोठ्या उत्साहात आयोजनासाठी कंबर कसली आहे. दि. २७ रोजी सकाळी ९ वाजता गावातील हनुमान मंदिर पिंपरणे येथून प्रस्थान होऊन गावातून भव्य मिरवणूक  होऊन दिंडी प्रस्थान होईल. दिंडीत रोज सकाळी साईबाबांची आरती , किर्तन,हरिपाठ ,भारूड, असे धार्मिक कार्यक्रम होतील .    तर मजल-दरमजल करत सतरा  रोजी  दिंडी-रथ शिर्डी येथे दाखल होईल.  या दिंडी सोहळ्याची सुरूवात साईबाबा भक्त परिवाराच्या वतीने केली होती. हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने यामध्ये सहभागी होतात. लोकसहभागातून सर्व खर्च भागविला जातो. त्यामुळे दिंडीत सहभागी होणाऱ्या भाविकांकडून कोणत्याही प्रकारचा खर्च भिशी आकारली जात नाही, हे या दिंडी सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्ये आहे. वर्षानुवर्षे दिंडीचा खर्च भाविक भक्त स्वेच्छेने करत आहेत. ही परंपरा आजतागायत जोपासली जात आहे. या दिंडीत व पूण्यसोहळयात  भाविकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ पिंपरणे भजनी मंडळ साई भक्त परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!