श्रीक्षेत्र निमज ते श्रीक्षेत्र पैठण दिंडीचे पिंपरणेत जोरदार स्वागत 
 होळी सणानिमित्त वारकऱ्यांना पुरणपोळ्याचा महाप्रसाद 
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
 श्रीक्षेत्र निमज  ते श्रीक्षेत्र पैठण या  पायी दिंडी सोहळ्याचे  पिंपरणे गावात भक्तीमय  वातावरणात स्वागत करण्यात आले गावात दिंडीचे आगमन होताच फटाके वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले विठ्ठल नामाचा जयघोष करत गावातील भाविकही मोठयाप्रमाणावर सहभागी झाले त्यामूळे गावातील वातावरण भक्तीमय झाले होते.
सालाबाद प्रमाणे ह भ प  निवृत्ती महाराज मतकर, ह भ प रामनाथ महाराज शेटे, ह भ प कानवडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निमज येथून पायी दिंडी सोहळयाचे प्रस्थान झाले  दिंडी बरोबर अरोग्य सेवेसाठी भोजन व्यवस्था, पानी, ह्या सर्व सुविधा बरोबर घेऊन अतिषय शिस्तबध्द मार्गस्थ झाली
 पिंपरणे येथे गुरुवार दिनांक 13  रोजी सायंकाळी ७ वा दिंडीचे आगमन झाले दिंडीचे स्वागत सरपंच नारायण मरभळ अजित देशमुख उत्तमनाना राहिंज विनोद साळवे पत्रकार सुभाष भालेराव मंजाबापू साळवे  कल्याण जोर्वेकर संजय बागुल राजू वाकचौरे शरद मांडे  गंगाराम वाकचौरे गोकुळ काळे  निलेश बागुल राहुल बागुल गोरक्षनाथ कर्पे सुरेश गाडेकर एकनाथ पवार सुनील साळवे सुनील दिवेकर   यांच्या  शुभाहस्ते पुजन करण्यात आले .यावेळी ग्रामस्थ मोठयाप्रमाणावर उपस्थित होते
दिंडीतील वारकरी व ग्रामस्थांनी गावातून प्रदक्षिणा करूण दिंडी हनुमान मंदिर या ठिकाणी आली या ठिकाणी दिंडीने हरिपाठ केला विठ्ठलाची आरती केली व नंतर किर्तन झाले किर्तन संपल्यानंतर
 त्या ठिकाणी सर्व वारकरी व ग्रामस्थांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती
 यावेळी वारकऱ्यांना पुरणपोळी महाप्रसाद अन्नदान उत्तमनाना राहींज,अजित देशमुख दीपक अभंग पत्रकार सुभाष भालेराव विनोद साळवे  मंजाबापू साळवे कल्याण जोर्वेकर  राजू वाकचौरे गोकुळ काळे शरद मांडे आचारी भाऊराव ठोंबरे सुधाकर कर्पे व ग्रामस्थ यांनी केले
 होळीचा सण असल्यामुळे सर्व वारकऱ्यांना व भाविकांना ग्रामस्थांना पुरणपोळीचा  महाप्रसाद देण्यात आला
 पुरणपोळी महाप्रसाद आचारी  भाऊराव ठोंबरे सुधाकर कर्पे, यांनी विनामूल्य बनवून दिला
रात्री विविध धार्मिक कार्यक्रम झाले गेली ९ वर्षापासून ग्रामस्थ ही सेवा अत्यंत प्रामाणिक पणे पार पाडत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!