देवगड विद्यालयाच्या इ 5 वी च्या ८ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल कामगिरी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयाने यंदा शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील आठ विद्यार्थ्यांनी पात्रता मिळवून शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेत दाखवलेली गुणवत्ता व मेहनत कौतुकास्पद असून, संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पात्र विद्यार्थ्यांची नावे
शिवन्या योगेश पावसे , ऋतुराज संतोष पावसे , वैष्णवी भगवान शिर्के , जय विजय पावसे , आर्या लहानु भालेराव , प्रगती संदीप पावसे , रणदीप संतोष शिरसाठ आणि मोहम्मद उमर मन्सूर इनामदार
या विद्यार्थ्यांनी शाळेतील नियमित सराव परीक्षा, कठोर अभ्यास व शिक्षकांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन यांच्या आधारावर हे यश संपादन केले आहे. शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या विशेष उपक्रमांचा आणि अतिरिक्त सराव सत्रांचा यामध्ये मोठा वाटा आहे श्री.माने मदन यांनी विद्यार्थ्यांना मराठी, श्री थोरात दिनेश यांनी गणित व बुद्धिमत्ता, श्रीम. वर्पे एस डी यांनी इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केले .
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती उगले सुनंदा यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, “आमच्या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्याने मेहनत करत हे यश संपादन केले आहे. शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन व पालकांचा सातत्यपूर्ण पाठिंबा देखील या यशामागील महत्त्वाचा भाग आहे. भविष्यात आमचे विद्यार्थी राज्यस्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करतील, असा आम्हाला विश्वास आहे.”
देवगड विद्यालयाने याआधीही विविध शैक्षणिक व स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने यश मिळवले असून, यंदाचे यश हे विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचे व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फलित आहे.
जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी गावचे सरपंच सन्माननीय सुभाषजी गडाख सर, उपसरपंच सुजाताताई दवंगे,देवगड देवस्थानाचे अध्यक्ष गणपत पावसे सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमेश पावसे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला .
