गोरगरीब जनतेचे कैवारी व सहकार चळवळीचे खरे जनक पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील – मंजाबापू साळवे
पिंपरणेत पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांची जयंती साजरी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करून शेती ,शिक्षण ,सहकार आणि औद्योगिककरण या सर्वांची सांगड घालून लाखो गोरगरीब जनतेचे जीवन सुखकर करणारे महान क्रांतिकारक व्यक्तिमत्व तसेच आशिया खंडातील पहिला सहकारी स्थापन कारखाना स्थापन करणारे थोर युगपुरुष “सहकार महर्षी
पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचे शेती, शिक्षण, सहकार आणि पाणी प्रश्नासंदर्भात मार्गदर्शन संपूर्ण देशाला आदर्शवत ठरेल राज्यातील सहकार क्षेत्रातच नव्हे, तर शिक्षण क्षेत्रातही आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट ठसा उमटविला
असे प्रतिपादन शिवसेना तालुका संघटक मंजाबापू साळवे यांनी केले
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे मंजाबापू साळवे यांच्या पुढाकारातून सहकार महर्षी
पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सहकार महर्षी पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी सहकार महर्षी
पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांना शब्दरूपी श्रद्धांजली वाहिली यावेळी कार्यक्रमासाठी शिवसेना तालुका संघटक मंजाबापू साळवे शुभम देशमुख रामदास भालेकर सुखदेव गायकवाड गोरक्षनाथ करपे रामभाऊ साळवे बाळासाहेब साळवे रमेश साळवे संदीप दिवेकर नाना देशमुख शंकर देशमुख बाळू दिवेकर नारायण खरात शिवाजी राहणे गणपत कुदळ सोमनाथ बागुल विजय साळवे वसंत अवचिते आदी सह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
