संगमनेर अकोले / लोकवेध live न्यूज
ब्राह्मणवाडा येथे शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांची मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली याप्रसंगी वीर पत्नी रूपाली गायकर, वीर जवान संदीप यांचे वडील पांडुरंग गायकर याचबरोबर विक्रम नवले, सुरेश गडाख , ॲड आर.बी हांडे, शिवाजी नेहे, सुभाष गायकर ,भारत आरोटे ,संदीप वाघमारे, रजनीकांत भांगरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
जम्मू काश्मीर मधील तिसवाड सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना 15 मराठा बटालियन मध्ये कार्यरत असलेले अकोले तालुक्याचे सुपुत्र संदीप जवान यांना हुतात्म प्राप्त झाले. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठी शोककळा पसरली. हे वृत्त समजतात मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शोक व्यक्त करत देशाच्या सीमांचे रक्षण करण्याकरता आपल्या सुपुत्राने बलिदान दिले असल्याने त्याची बलिदान हे व्यर्थ जाणार नसून या त्यांच्या बलिदानाचा संपूर्ण जिल्ह्याला अभिमान राहील असे गौरवोउद्गार काढले होते.
आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. याचबरोबर या सुपुत्राने देशासाठी बलिदान दिले असून अहिल्यानगर जिल्हा , संगमनेर तालुका व अकोले तालुका हा सदैव या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहील असे सांगताना वीर जवान संदीप याचा आपल्याला सदैव अभिमान राहील अशी भावना व्यक्त केली.
यावेळी गावातील पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
