पिंपरणे ग्रामपंचायत मध्ये  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
सर्व जाती धर्माच्या जनतेला सोबत घेत पाण्याचे महत्त्व ओळखून अहिल्यादेवी होळकर यांनी देशातील अनेक प्रांतात विहिरी, बारवांसह जलसंधारणाची मोठी कामे केली .एक तत्त्वनिष्ठ, आदर्शवादी ,शूर आणि सुधारणावादी राज्यकर्त्या म्हणून त्यांचे जीवन कार्य देशाला सदैव दिशादर्शक  असून विहिरी बारव याचबरोबर महिला या पुरुषांप्रमाणे आदर्शवत कामातून नावलौकिक मिळू शकतात हे अहिल्याबाई होळकर यांनी सिद्ध करून दाखवले. देशातील सर्व महिलांसाठी अत्यंत स्फूर्तीदायी त्यांचे कार्य आहे
 त्यांनी जलसंवर्धनासाठी मोठे काम केले अशा या महान पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती संगमनेर  तालुक्यातील पिंपरणे येथे ग्रामपंचायत कार्यालयात शनिवार दि 31 मे 2025 रोजी सकाळी 10 वा साजरी करण्यात आली यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुण्यश्लोक  अहिल्यादेवींच्या प्रतिमेस सरपंच नारायण मरभळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला
 यावेळी कार्यक्रमासाठी  उत्तमनाना राहींज मंजाबापू साळवे अजित देशमुख विनोद साळवे संजय बागुल श्रीकांत बागुल राहुल निकम बाबासाहेब राहींज शुभम काळे नितीन बागुल प्रदीप मांडे सुरेश साळवे  आदी सह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!