* हळनोर कुटूंबाचा एक आधार स्तंभ हरपला!…प्रा.श्री.रामदास पा.खेमनर सर..*

*”कष्टाने केली आयुष्याची* *सुरुवात,सर्वांवर मायेने फिरविला हात!..*
*सुख जवळ येताच काळाने फिरविलि पाठ,जन्मो जन्मी पाहू आम्ही तुमची वाट!…*

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

*कै.दादा अप्पा ह्ळ्नोर आणि कै.शेवंताबाई उर्फ उमाबाई यांचे पोटी नऊ मुले आणि एक मुलगी यांना जन्माला घातले.१) श्री.धोंडिबा दादा हळ्नोर २) स्वर्गीय बाबुराव दादा ह्ळ्नोर ३) किसन दादा हळ्नोर ४) पोपट दादा हळ्नोर ५) स्वर्गिय मुरलीधर दादा हळ्नोर ६)श्रीबाळासाहेब दादा हळ्नोर ७) श्री.इंद्रभान दादा हळ्नोर ८) श्री.भागवत दादा हळ्नोर ९) श्री.श्रावण दादा हळ्नोर १०) ग.भा.कमल नामदेव खेमनर असा हा मोठा परिवार ….*
*याच परिवारात स्वर्गीय बाबुराव दादा हळ्नोर यांचा जन्म दि.१/०१/१९५३ मध्ये झाला.कुटूंब मोठे आणि घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही.प्रामाणिक,जिद्द,चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे मजुरिचे कामे करुन या मोठ्या परिवाराचा उदरनिर्वाह ते करत असे.कष्ट करण्याची वृत्ती यामुळे काम कोणतेही असो ते पुर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे.बंधू प्रेम याप्रमाणे या नऊ भाऊ आणि एक बहिण यांचे एकमेकावर जिवापाड प्रेम असे.त्यामुलळे थोडे जरी यापैकी कुणाला काही झाले तर राम-लक्ष्मणा प्रमाणे मदतीसाठी एकमेकास धाऊन येत.एवढेच नाही तर छोट्या मोठ्या सुख आणि दु:ख प्रसंगी देखील हे सर्वजण सहभागी होत.शांत,संयमी,मनमिळावू ,दानशुर वृत्ती,स्वभाव यामुळे या परिवाराचा मोठा नावलौकिक झाला.परिवार मोठा असुन देखील नऊ भाऊ आणि एक बहिण तसेच नऊ भावजयी यांच्यात कधीही वाद-विवाद नाही.प्रत्येकांचा आज देखील आदर सन्मान करत आहे.याच परिवारातील स्वर्गीय बाबुराव दादा हळ्नोर यांनी अतिशय काबाड कष्ट करुन आपला संसार फुलविला.संगमनेर येथिल प्रसिध्द कादर बागवान यांच्याकडे प्रामाणिक पणे ४० वर्ष सेवा केली.आणि त्या परिवारातदेखील स्वर्गीय बाबुराव यांनी आपल्या प्रामाणिक आणि कष्टाच्या जोरावर मोठा नावलौकिक केला.सन १९६५ ते १९९५ या काळात एकच मालकांकडे टॉमेटो भरणे,केळीची गाडी भरणे,चिंच झोडने इ .मजुरिची कामे केली तीही प्रामाणिक याच दरम्यान राहुरी ते संगमनेर चिंच झाडे झोडून आणि चिंचा गोळा करुन त्या पोत्यात अदांजे ७० ते ८० किलो वजनाचे भरुन ती पँक करुन सायकलवर संगमनेरला पोहचवायचा विक्रम त्यांच्या नावावर पडला होता.त्यावेळी अनेक बक्षिसे स्वर्गीय बाबुराव दादा हळ्नोर यांनी आपले मालक कादर बागवान यांचेकडून मिळविली.कामात हातखंडा असलेले स्वर्गीय बाबुराव दादा हे बघता-बघता बागवान परिवाराचे एक सहकारी सदस्य झाले त्यांनी कधीही कामगार समजले नाही त्यांच्या प्रत्येक सण,उत्सव,विवाहात देखील स्वर्गीय बाबुराव दादा यांना फार मोठा सन्मान होता.कादर बागवान कायम स्व.बाबुराव यांना म्हणत की,तुम्ही काम करत जाऊ नका फक्त मजुराकडून काम करुन घ्या.पण काम न करता फुकटचे पैसे घेणे हे स्वर्गीय बाबुराव यांना कधिच पसंत नव्हते.”कष्ट हिच माझी भाकर” या उक्तिप्रमाणे कष्टाचे मोल हे अंतिम मानुन ते इतर कामगाराकडुन काम करुन न घेता त्यांच्यात सामिल होवुन काम करत असे.त्यांचे एक वैशिष्ठे होते की,काम करतांना इतरानांही ते साभांळून घेत त्यामुळे याच कामातून त्यांनी मोठा मित्र परिवार जमा केला.दुसरे वैशिष्ठे असे की,”आगे मोहळ “म्हटले तर चांगले-चांगल्याची फाटते परंतु कितीही मोठे आगे मोहळ कुठेही असू द्या.ते स्वर्गीय बाबुराव दादा स्वत: काढण्यात तरबेज होते.याबाबत त्यांना कधीही भिती वाटली नाही यामुळे त्यांचा संगमनेर तालुक्या बरोबरच पंचक्रोशीत चांगला बोल बाला होता.त्यांनी अखेर पर्यंत “कष्ट हेच जीवनाचे प्रामाणिक सार” आहे म्हणून ते कधीही रिकामे राहत नसे.अंभोरे गावात सुरुवातीला एक छोटशे किराणा दुकान स्वर्गीय भिकुबाई हिस सुरु करुन दिले त्याही कामात खुप मोलाची मदत तीस होत त्यामुळे कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी मदत होत.यावरच कुटूंब सांभाळण्याची यशस्वी जबाबदारी पार पाडली.सकाळी उठल्यापासुन ते रात्री झोपेपर्यंत शेतात,गोठ्यात काहीना काही तरी काम करत. त्यांना आळस हा कधीही नव्हता.त्यांना कामाविना जमत नसे.शेती थोडी पण ती कशी करावी,तीची निगा कशी राखावी,उत्कृष्ठ गुणवत्तापुर्ण पिक* *कसे घ्यावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते.संसार रुपी जीवनाच्या सागरात जिवन जगत असतांना पती आणि पत्नी ही दोन रथाची चाके आसतात.त्यामुळे संसाराचा रथ चांगला सुरळीत चालतो.असाच सोन्यासारखा संसार चालू असतांना पत्नी कै.भिकुबाई बाबुराव हळ्नोर दोन वर्षापूर्वी मानसिक आजार जडला या आजाराने त्या त्रस्त झाल्या आणि आजारी पडल्या.जवळ जवळ एक वर्ष त्या अंथरूणावर पडुन होत्या त्यांची स्वत: स्वर्गीय बाबुराव दादा हळ्नोर यांनी खुप काळजी घेतली. आणि संपुर्ण जबाबदारी त्यांच्यावर पडली.स्वर्गीय पत्नीचे त्यात दि.23/०८/२०२४ रोजी त्यांचे वयाच्या ७३ व्या.वर्षी निधन झाले.त्यामुळे आपला जिवन साथी आपल्याला कायमचा सोडुन गेल्याने स्वर्गीय बाबुराव दादा हळ्नोर पुर्ण खचले.त्यांना श्री.सुरेश,श्री.सुभाषराव,कै.भास्कर,श्री.अण्णासाहेब अशी चार मुले,सुना-: शोभा/ सौ.उषा,ग.भा.मनिषा आणि सौ.सुरेखा आणि मुली सौ.तारा बबन कडनोर,सौ.हिरा जगन कडनोर आहेत.त्यांची परीस्थिती जेमतेम असुन अगदी समाधानाने जिवन जगतात.यापैकी श्री.सुभाषराव बाबुराव हळ्नोर हे सामाजिक,राजकिय,धार्मिक,शैक्षणीक,समाज चळवळीतील एक आक्रमक स्वाभिमानी,परखड व्यक्तिमत्व,प्रत्येकांच्या सुख आणि दु:खांत कायम सहभागीअसे. श्री.सुभाषराव बाबुराव हळ्नोर यांनी अंभोरे गावाबरोबरच संगमनेर तालुक्यासह संपुर्ण अहिल्यानगरचे यशवंत सेना उपजिल्हाप्रमुख या पदावर काम करीत असतांना अहिल्यानगर सह महाराष्ट्रात मोठा जनसंपर्क आहे.सुभाषरावांचा देखील आपल्या वडिलांप्रमाणे मोठा मित्र परिवार जोडलेला आहे.या सर्व गुणांनमुळे स्वर्गीय बाबुराव दादा हळ्नोर यांना सुभाषरावचा खुप अभिमान असे आणि त्यांच्या या कार्याचे ते नेहमी कौतुक देखील करीत असे.कै.भिकुबाई बाबुराव* *हळ्नोर यांची सुध्दा संपुर्ण आजारपणात काळजी घेण्याचे काम मुलगा श्री.सुभाषराव,सुन सौ.उषाताई,नातु,संकेत,सौरभ,संकल्प यांनी केले त्यांची खुप चांगली सेवा केली.विशेत: उषाताई हिने विशेष काळजी घेत दोन्ही सासू,सासरे यांची प्रामाणिक पणे खुप सेवा केली आणि अखेरपर्यंत काळजी घेतली.हे बघुन माझी देखील अशीच काळजी सेवा घेतील हा विश्वास त्यांना वाटत असे.नेहमी त्यांना वाटे.कै.भिकुबाई यांचे निधनाचा परिणाम स्वर्गीय बाबुराव दादा हळ्नोर यांचे तब्बेतीवर झाला.त्यात त्यांना खोकला येऊ लागला.तो इतका वाढू लागला की,औषोधोपचार करुन देखील खोकला बंद झाला नाही.अखेर त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला.पत्नी स्वर्गीय भिकुबाई निधन होउन नऊ महिने होत नाही तोच गुरुवार दि.५/०६/२०२५ रोजी दुपारी १२.३३ मी.वयाच्या ७६ व्या.वर्षी त्यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेत हळ्नोर परिवार,गावाचा आणि या विश्वाचा निरोप घेतला.सुन सौ.उषाताई सुभाषराव हळ्नोर यांनी आई -वडिलांप्रमाणे सासू भिकुबाई आणि सासरे स्वर्गीय बाबुराव दादा हळ्नोर यांची सुध्दा खुप काळजी घेत चांगली सेवा केली.सौ.उषाताई हिने अखेर पर्यंत त्यांना आई -वडिल मानले होते अगदी त्याचप्रमाणे त्यांनी सुध्दा तीस मुलीप्रमाणे सांभाळले होते. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंभोरे येथिल अमरधाम मध्ये मुलांनी मुखाग्नी देत मुले,मुली,सुना,भाऊ,नातु,नाती,भावजयी सर्वांनी अश्रुनयनांणी अखेरचा निरोप घेतला.यावेळी अँड.शंकरराव खेमनर,श्री.भास्करराव खेमनर स्विय सहाय्यक,लोकनेते मा.श्री.बाळासाहेब थोरात साहेब अँड.लक्ष्मणराव खेमनर अँड.अशोकराव हजारे,जांभुळवाडी ग्रामपंचायत सरपंच,श्री.कोंडाजी कुदनर,भाऊसाहेब गुंजाळ पाटील विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य के.जी.सर,सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक श्री.सहादू दामू खेमनर,विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन श्री.रावजी भागा खेमनर,संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मा.संचालक श्री.रावसाहेब रावजी खेमनर,महासत्ता न्यूज चायनलचे संस्थापक,श्री.नवनाथ वावरे,डॉ.प्रा.आण्णासाहेब* *जगनर,आदीं.मान्यवरांकडून भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.प्रसंगी संग्राम मूकबधिर विद्यालयाचे प्राचार्य श्री.चांगदेव खेमनर,एस.एम्ं.खेमनर सर,अंभोरे ग्रामपंचायत सरपंच,सौ.सुरेखा खेमनर,उपसरपंच किसनराव खेमनर,व्हाईस चेअरमन वाल्मिक खेमनर,व्हाईस चेअरमन तुळशीराम मलगूंडे यांचेसह स्थानिक संस्थाचे पदाधिकारी नागरिक,ग्रामस्थ,महिला,नातेवाईक,सामाजिक,राजकिय,धार्मिक,शैक्षणीक,वैद्यकिय,विधी,कृषी क्षेत्रातील अनेक मान्यंवर,मित्र परिवारासह मोठ्या संख्खेने जनसमुदाय उपस्थित होता.*
*मी.आणि माझे खेमनर परिवाराचे वतीने स्वर्गीय बाबुराव मामांना विनम्र भावपुर्ण श्रद्धांजली!🙏💐💐*
*शब्दांकन: प्रा.श्री.रामदास पाराजी खेमनर सर.अंभोरे ता.संगमनेर जि.अहिल्यानगर.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!