पत्रकार व त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे भक्कम उभे राहणार-आ खताळ

व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकारां च्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप

संगमनेर / लोकवेध live न्यूज

पत्रकार हा जनसामान्य माणसाचा आधारस्तंभ आहे .माझ्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये पत्रकारांचे योगदान महत्त्वाचा आहे .तर मी आमदार होण्यात पत्रकारांचेही योगदान महत्त्वाचे आहे त्या मुळे. त्यांचे कुटुंब हे माझे कुटुंब आहेअसे समजून कायमस्वरूपी पत्रकारांच्या पाठी मागे भक्कमपणे उभे राहणार असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली
पत्रकारांचे कर्तव्य जरी समाजासाठी असलं तरी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी ही तितकीच महत्त्वाची आहे .या जाणिवे तून व्हॉइस ऑफ मीडिया याआंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या माध्यमातून आ. अमोल खताळ यांच्या हस्ते पत्रकारांच्या पाल्याचा शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला त्यावेळी आयोजित कार्य क्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठा वर व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, खजिनदार गोरक्षनाथ नेहे, संगमनेर तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू, शहराध्यक्ष महेश पगारे, सचिव सचिन जंत्रे, कार्याध्यक्ष भारत रेघाटे , ज्येष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे , संजय अहिरे, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांच्या सर्व पाल्यांना आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमा तून शालेय साहित्य वाटप करण्यात आले
आ खताळ म्हणाले की संगमनेर मधील पत्रकार यांचा माझा अनेक वर्षा पासून मैत्री आहे त्यांनी मला येथून मागेही खूप मदत केली आहे मी इथून पुढेही नक्कीच करतील अशी मला आशा आहे. त्यामुळे त्यांच्या पाल्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देणे माझे कर्तव्य आहे म्हणून मी इथून पुढे प्रत्येक वर्षी त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य देणार असल्याची घोषणा आ.अमोल खताळ यांनी केली .
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे मात्र आपल्या कुटुंबासाठी वेळ नसत मुलांच्या उज्वल भवित्यासाठी तसेच कौटुंबिक जबाबदारी देखील पार पाडावी असं मनोगत तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू यांनी व्यक्त केला . पत्रकारांच्या कुटुंबा तील मुलं ही समाजाच्या सक्षम भवितव्या साठीची बीज आहेत त्यांना प्रोत्साहन देणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचे मनोगत जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी व्यक्त केलं. पत्रकारांनी साहित्य वाटपाच्या अनेक बातम्या आपल्या दैनिकातून प्रसिद्ध केल्या परंतु त्यांच्या पाल्यांना आत्तापर्यंत शैक्षणिक साहित्य कुणीही दिले नाही मात्र आमदार अमोल खताळ यांनी पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे जिल्हा खजिनदार गोरक्ष नेहे आणि सदस्य संजय अहिरे यांनी यावेळी सांगितले उपस्थितांचे आभार जेष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे यांनी मानले


संगमनेर शहरात एक पत्रकार भवन व्हावे यासाठी यापूर्वीच आपण आमदार निधीतून दहालाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे.मात्र आता जागेचा प्रश्न बाकी राहिला आहे. दोन ठिकाणी जागा निदर्शनास आलेल्या आहेत. त्यातील एक जागा पत्रकार भवनासाठी उपलब्धकरून देण्याबाबतचे निर्देश आपण नगरपालिके च्या मुख्याधिकार्यांना दिले असून पत्रकार भवन लवकरातलवकर उभे करण्यासाठी आपण प्रयत्न करू
आमदार अमोल खताळ
सदस्य संगमनेर विधानसभा


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!