संगमनेर शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणणार : आ. खताळ
अग्निशमन (गुरखा) वाहनाचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण
संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे
संगमनेर नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. नगर विकास विभाग हा उप मुख्यमंत्री व नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत आहे. आणि त्यांचे संगमनेरवर विशेष प्रेम आहे. त्या मुळे येत्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून संगमनेर शहराच्या विकासासाठी महयुती सरकारच्या माध्यमातून संगमनेरच्या विकासासाठी भरीव निधी आणणार असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
महाराष्ट्र अग्निशमन सुरक्षा अभियानां अतर्गत संगमनेर नगरपालिकेला महायुती सरकारच्या माध्यमातून नवीन अग्निशामक (गुरखा) मिनी रेस्क्यू अग्निशमन वाहन मिळाले असून त्या वाहनाचा लोकार्पण सोहळा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडला. या वेळी व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक ऍड.श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक जावेद जागीरदार , ज्ञानेश्वर कर्पे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहाणे, शहर अध्यक्ष दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, रामभाऊ जाजू शौकत जागीरदार रोहित चौधरी सौरभ देशमुख विकास पुंड विकास डमाळे भाजपच्या शहराध्यक्ष पायल ताजने माजी नगरसेविका अल्पना तांबे मेघा भगत कांचन ढोरे,मुख्याधिकारी रामदास कोकरे कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजाळ प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांच्या सह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले,की ” संगमनेर शहरात अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद आहे त्यात एखादा अपघात घडल्यास अशा वाहनांची गरज भासते आणि आता हे वाहन वेळेवर पोहोचून नागरिकांचे प्राण वाचवू शकेल. असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले की संगमनेरमध्ये विकास कामे करत असताना अनेक अडथळे येतात तर काही जण, अफवा पसरवितात. मात्र मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो .केंद्रात, राज्यात व तालुक्यात महायुतीचे सरकार असल्या मुळे तुम्हाला कोणाकडूनह कोणीही त्रास होणार नाही. नगरपालिकेत येणाऱ्या सर्वसामान्य लोकांची कामे झाली पाहिजे यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची शिफारस न घेता नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा,” मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अल्पावधीतच यांनी संपूर्ण शहरात शिस्तीचे वातावरण निर्माण केले आहे. मात्र काही माजी नगरसेवक अजूनही सत्ता असल्याच्या थाटात वागत आहेत. यावर उपाययोजना करा असे सक्त निर्देश आ. खताळ यांनी मुख्याधिकार्यांना दिले
संगमनेर नगरपालिकेत नव्याने दाखल झालेल्या गुरखा या अग्निशमन वाहनाचा उपयोग, त्याचे कार्यक्षेत्र, आणि भविष्या तील बचाव कार्यातील भूमिका याविषयी सविस्तर माहिती संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली. सूत्रसंचालन पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजाळ यांनी केले, तर आभार प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांनी मानले.
