श्री क्षेत्र काळुबाई मंदिर, येथे आषाढातील मंगळवारी पारंपरिक जागरण-गोंधळ संपन्न — राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख यांचा ग्रामस्थांकडून सन्मान

आंभोरे / लोकवेध live न्यूज

श्री क्षेत्र काळूआई देवी मंदिर, आंभोरे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढ महिन्यातील मंगळवारी देवीचा जागर मोठ्या भक्तिभावाने पार पडला. मंगळवार, दिनांक १५ जुलै रोजी  जागरण-गोंधळाचा भव्य धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास देवीच्या दर्शनासाठी आणि भक्तीमय जागराचा लाभ घेण्यासाठी परिसरातील शेकडो भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजहंस दूध संघाचे चेअरमन मा. रणजित देशमुख साहेब उपस्थित होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या एकतेचे आणि श्रद्धेचे कौतुक केले. या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांमध्ये ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, तसेच सहकारी संस्थांचे चेअरमन, उपाध्यक्ष, संचालक आणि अनेक ग्रामस्थ व भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात जागरण-गोंधळ रंगला. महिलांनी देवीच्या गोंधळगीतांनी वातावरण भक्तिमय केले.

या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन ग्रामस्थांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले. मंदिर समिती, युवा कार्यकर्ते, महिला मंडळ यांचे विशेष योगदान उल्लेखनीय ठरले.

या पवित्र जागरणाच्या निमित्ताने गावात धार्मिक एकात्मता, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!