शिवधर्म, समता आणि राष्ट्रसेवेचा संगम – शिवनेरी किल्ल्यावर रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवराज्य निर्माण संघटनेचा ८ वा वर्धापन दिन भव्य उत्साहात साजरा!”

शिवनेरी किल्ला | लोकवेध live न्यूज 


हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थानी, शिवनेरी किल्ल्यावर शिवराज्य निर्माण संघटनेचा ८ वा वर्धापन दिन हा राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा आणि सामाजिक समतेचे दर्शन घडवणारा कार्यक्रम ठरला. या कार्यक्रमात केंद्रस्थानी होते – शिवभक्त, समाजसेवक, आणि परिवर्तनवादी नेतृत्वाचे प्रतीक मा. रणजितसिंह देशमुख.

कार्यक्रमाची सुरुवात ओझर (ता. जुन्नर) येथील विघ्नहर्ता श्री गणपतीच्या दर्शनाने झाली. देशमुख साहेब आणि त्यांच्यासोबत असलेल्या शेकडो युवा कार्यकर्त्यांनी मंदिरात दर्शन घेत भक्तिभावाने प्रार्थना केली. गणपती देवस्थान ट्रस्टने देशमुख साहेबांचा यथोचित सन्मान केला.

त्यानंतर शिवनेरीकडे प्रस्थान करताच तेथे नगरसेवक श्री. भाऊ कुंभार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले. शिवाई देवीच्या चरणी आरती करून छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या घोषणांनी संपूर्ण किल्ला दुमदुमला.

विशेष आकर्षण ठरले शिवचरित्र अभ्यासक श्री. दीपक कर्पे यांचे व्याख्यान. त्यांनी छत्रपतींच्या जन्मापासून स्वराज्य स्थापनेपर्यंतचा इतिहास, त्यांचा संघर्ष, विजयी मोहिमा यांचे उत्तम विवेचन केले. त्यांनी संगमनेर तालुक्यातील रायतेवाडीची लढाई, पेमाई डोंगरावरील वास्तव्य व निमगाव पागातील पागांचा ऐतिहासिक संदर्भ देत परिसरातील शिवकालीन वारसा उलगडून दाखवला.

या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिवधर्मासोबत सामाजिक कार्याला जोड देणारे नेतृत्व – रणजितसिंह देशमुख.
त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की संघटना ही केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक समतेसाठी, अन्यायग्रस्तांसाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करणारी चळवळ आहे. त्यांनी छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांचा वारसा सांगत नव्या पिढीला झोपेतून जागे करणारे विचार मांडले.

यापुढील काळात संघटनेतर्फे कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिर, समाज प्रबोधन, संघटनात्मक बांधणी आणि वंचित घटकांसाठी उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

शिवनेरीवर साजरा झालेला हा वर्धापन दिन म्हणजे शिवस्मरण, शिवसेवा आणि शिवसंघटनेच्या पुढील वाटचालीचा संकल्प!
आणि या वाटचालीचे नेतृत्व करीत आहेत – मा. रणजितसिंह देशमुख, ज्यांच्या कृतीतून छत्रपतींच्या विचारांचे दर्शन घडते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!