सेवाभावी शिक्षकाच्या सेवेचा सोहळा… तीन दशकांच्या ज्ञानयात्रेला मानाचा मुजरा!”

 – प्राचार्य कैलास वर्पे यांच्या सेवानिवृत्ती गौरव समारंभास उत्स्फूर्त प्रतिसा

कनोली (संगमनेर) लोकवेध live न्यूज 

सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संचलित मा. श्री. भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कनोली येथील प्राचार्य मा. कैलास म्हातारबा वर्पे यांनी तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात यशस्वी कार्य करून नियमानुसार सेवा निवृत्ती पत्करली. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सेवापूर्ती गौरव समारंभ मंगळवार, दि. २२ जुलै २०२५ रोजी विद्यालयाच्या प्रांगणात भव्यदिव्य वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून सर्व उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर तांबे, चेअरमन – सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज, संगमनेर हे होते.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आणि मान्यवर म्हणून उपस्थित होते: स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सिताराम वर्पे पांडुरंगशेठ घुलेमा. गणपतराव सांगळेसुरेशराव थोरातसतीश वर्पेमा. सुमंत कोल्हेभाऊसाहेब पवारनानासाहेब वर्पेआर. एल. वर्पेमिनानाथ वर्पेप्रकाश वर्पेबंडू वर्पेलहानभाऊ वर्पेप्रा. दिलीप नवलेजनार्दन पवारसोपानराव मानेरविंद्र थोरातअर्जुन खुळेबाळासाहेब ब्राम्हणेघोलप सरभालके पाहुणेदत्तात्रय थोरातसाहेबराव खुळेशिवाजीराव काळेचंद्रभान खतोडेसतीश खतोडेसागर हासेगंगाराम घारेप्रकाश गोर्डेगुलाब भोरप्राचार्य बी. एम. गायकवाड,

तसेच शिक्षकेतर प्रतिनिधी थॉमस जगतापस्थानिक शाळा समितीशालेय व्यवस्थापन समितीपालक संघग्रामपंचायत सदस्य, तसेच कनोली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राचार्य कैलास वर्पे हे शिस्तप्रिय, निष्ठावान, विद्यार्थ्यांप्रती समर्पित आणि नेहमी प्रेरणास्थान राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात भरीव प्रगती साधली. आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी ७५ हजार रुपयांची देणगी देऊन उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्या देवकर व गोरक्षनाथ थोरात यांनी सुरेखपणे पार पाडले.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत भावनिक व प्रेरणादायी वातावरणात पार पडले.

या गौरव समारंभाने प्राचार्य कैलास वर्पे सरांच्या तीन दशकांच्या समर्पित कार्याला कृतज्ञतेचा सलाम अर्पण केला. सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, समाधान आणि सक्रिय जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!