“हर्षलचा मृत्यू नाही, ही सत्ता नामशेष होण्याची सुरुवात आहे!p
ही लाचखोरीची व्यवस्था नाहीशा करण्याची चळवळ आहे!”
संगमनेर / लोकवेध live न्यूज
राज्य सरकारच्या “हर घर जल” योजनेचं ढोंग आता एका कुटुंबाच्या अश्रूंमध्ये बुडालं आहे. ३२ वर्षीय तरुण अभियंता-कंत्राटदार हर्षल पाटील याने जलजीवन मिशनखाली १.४ कोटी रुपयांचं काम पूर्ण केलं – पण त्याला एकही रुपया मिळाला नाही! वर्षभर थकलेल्या बिलांच्या आणि ६५ लाख कर्जाच्या ओझ्याखाली हा तरुण उद्ध्वस्त झाला, आणि शेवटी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.
पण हा मृत्यू नाही… ही हत्याच आहे – शासनाने केलेली, व्यवस्थेने जपलेली!
सरकार जाहिरातीत झळकतं – आणि तरुण पाण्याच्या टाक्या बांधून मरतात!
“हर घर जल” म्हणताना सरकारने गावोगाव नळ काढले, पण पाणी नाही दिलं. ठेकेदारांकडून रात्रंदिवस काम करून घेतलं, पण पैसा नाही दिला. आता जेव्हा हेच तरुण कर्जाच्या विळख्यात येऊन संपतात, तेव्हा सरकार म्हणतं – “निधी नाही…”!
मग हे मंत्री ‘हर घर जल’चे फोटो कशासाठी छापत होते?
हे जलजीवन नाही, तर युवकांचा जलसमाधी आहे!
कोण जबाबदार? हर्षल की शासन?
हर्षलचा मृत्यू ही व्यक्तीगत हार नाही – ती तर भाजप सरकारच्या कुशासनाची, बेफिकीर धोरणांची, आणि भ्रष्ट व्यवस्थेची भयानक कबुली आहे.
🟥 शासन – ज्यांनी बिलं दिली नाहीत
🟥 प्रशासन – ज्यांनी आवाज दाबला
🟥 आणि राजकारणी – ज्यांनी मृत्यूवरही राजकारण केलं
यांचा सामूहिक गुन्हा म्हणजे हर्षलचा मृत्यू!
हे सरकार ‘विकास’ नव्हे – तर ‘विनाश’ करतंय!
📢 शेतकरी मरण्याची सवय झाली होती…
आता तरुण उद्योजकही मरण्याची वेळ आलीय का?
📢 हे सरकार रोजगाराच्या नावाखाली प्राण घेतंय
📢 हे प्रशासन कंत्राटदारांच्या कुटुंबांवर अंत्यसंस्कार करतंय
📢 आणि हे मंत्री केवळ श्रध्दांजली ट्वीट करतायत!
जनतेनो, आता गप्प बसू नका!
⛔ हर्षलच्या मृत्यूवर मौन बाळगणं म्हणजे गुन्ह्यात सहभागी होणं
⛔ ही हत्या आहे – आणि प्रत्येक भारतीयाने याविरुद्ध लढायलाच हवं
⛔ बिल थकवल्याच्या जबाबदारीवर अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत
⛔ सरकारला आता उत्तर द्यावंच लागेल – अन्यथा जनतेचा उद्रेक थांबवता येणार नाही!
🔥 हर्षल एक तरुण होता – उद्याचं स्वप्न होता.
त्याचा मृत्यू जर आज तुमचं मन हलवत नसेल…
तर उद्या तुमच्याच घरातली वीज, पाणी, आशा सुद्धा अशीच हरवेल!
✊ सत्ता घाबरली पाहिजे –
कारण आता जनता जागी झाली आहे!
