शैक्षणिक जागृतीचा प्रेरणादायी उपक्रम : देवळा येथे धानोरा केंद्राची पहिली शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
अंबाजोगाई / लोकवेध live न्यूज
धनोरा केंद्र अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीची पहिली शिक्षण परिषद दिनांक २४ जुलै रोजी देवळा येथील विश्वरुपी माध्यमिक विद्यालयात अत्यंत उत्साही वातावरणात आणि शैक्षणिक उन्नतीचा निर्धार घेऊन संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. कु. उत्कर्षा शितोळे व कु. साक्षी खामकर या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. खोसे एस. जे. होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख श्री. तट डी. डी., केंद्रीय मुख्याध्यापक श्री. जोगदंड टी. डी., तसेच शिक्षणक्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. गोविंदराव यादव उपस्थित होते.
या परिषदेचे सुलभक म्हणून श्री. शेख आर. एम., श्री. गंगणे एस. एम., श्री. शेख ए. ए., श्री. वाघमारे एस. आर., श्री. बेले आर. डी. यांनी उत्कृष्ट समन्वय व नियोजन केले.
परिषदेत पॅट महाराष्ट्र योजना, विद्यार्थी उपस्थिती आणि गुणवत्तावाढ, ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम, शाळाबाह्य मुले शोध मोहीम, तसेच शाळा व्यवस्थापन समिती नियुक्ती प्रक्रिया यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन व चर्चा झाली.
धानोरा केंद्रातील शिक्षकवर्ग या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हनुमंत पाडे यांनी अतिशय प्रभावीपणे केले.
या यशस्वी परिषदेकरिता विश्वरुपी माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवळा येथील शिक्षकांनी परिश्रमपूर्वक सहकार्य केले.
ही परिषद शिक्षकांना नवचैतन्य देणारी ठरली असून, पुढील शैक्षणिक वाटचालीस एक सुदृढ दिशा मिळाल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
