ॐ नमः शिवायच्या घोषात आम्लेश्वर महादेवाचा रसरंगी अभिषेक

अंभोरे / लोकवेध live न्यूज

श्रावणी तिसरा सोमवार या पवित्र पर्वानिमित्त सायंकाळी ७ वाजता आम्लेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरणात अभिषेक व पूजा विधी संपन्न झाला. पुरोहित गुरु ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारांच्या गजरात ऊसाचा रस, आंब्याचा रस, दूध, दही तसेच विविध फळरसांनी आम्लेश्वर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर विधिवत पूजा, आरती व प्रसाद वितरण करण्यात आले.

या धार्मिक सोहळ्यास जनार्दन मौनगिरी महाराज यांच्या स्वामी दत्त पावन आश्रमाचे मठाधिपती, राष्ट्रीय अध्यक्ष, पंचदशनाम जुना आखाडा नीलपर्वत, त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील महामंडलेश्वर १००८ स्वामी शिवगिरिजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य, महंत १०८ प.पू. वाल्मिकगिरिजी महाराज यांची पावन उपस्थिती लाभली. तसेच श्री. किसनराव खेमनर, श्री. सुभाषराव हळ्नोर, हौशिराम वाघमोडे, श्री. गोविंद खेमनर, श्री. राजू देशमुख, कैलास जगनर, रावसाहेब शेरमाळे, रामदास मडके, समाधान खेमनर, गुरु आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रावणी सोमवारच्या या रसरंगी अभिषेक व पूजेच्या माध्यमातून भाविकांनी श्रध्देने भगवान महादेवाचे दर्शन घेतले व पुण्यसंचय प्राप्त केला. परिसरात “ॐ नमः शिवाय”च्या अखंड जयघोषाने दैवी वातावरण निर्माण झाले होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!