व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करणार -आमदार खताळ

संगमनेर व्यापारी असोशिएशनने आ अमोल खताळ यांना निवेदन देऊन केली कारवाईची मागणी

संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे 

संगमनेरची बाजारपेठ व्यापाऱ्यांच्या त्यागातून व कष्टातून फुलली आहे. सध्या सण उत्सवाचे दिवस सुरू आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपली एकजूट कायम दाखवावी. जर विनाकारण संगमनेरच्या व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करून विनाकारण कोणी त्रास देत असेल तर त्यांचाबंदोबस्त केला जाईल असा इशारा आमदारअमोल खताळ यांनी दिला
संगमनेर शहरातील मोहनलाल बन्सी लाल दरडा यांच्यामार्फत एका किरकोळ किराणा विक्री दुकानात भेसळयुक्त गुळ विक्री होत असल्याची तक्रार अहिल्या नगर येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाला केली होती त्यानंतर औषध आणि प्रशासन विभागाचे अधिकाऱ्यांनी संगमनेरला येऊन दरडा यांच्या सिद्धी शुद्ध नैसर्गिक गुळाची तपासणी केली त्याचे नमुने शासकीय प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात आले त्यात सदरचा गुळ हा प्रमाणित असल्याबाबत तपासात सिद्ध झाले त्याचा अहवाल प्रमाणपत्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्राप्त झाले आहे तरीसुद्धा काहीजण दर्डा बंधूंना विनाकारण त्रास देत आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे
याविषयी माध्यमांशी बोलताना आ खताळ म्हणाले की संगमनेर शहरातील व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी वेळोवेळी काळजी घेत आहे जर संगमनेरचे व्यापारी चुकीचे वागत असेलतर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. परंतु विनाकारण जर व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करून काहीजण त्रास देऊन आपल्या तुंबड्या भरण्याचे काम करत आहे अशा अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत मात्र जर येथून पुढील काळात जर कोणी व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा व्यापाऱ्यांच्या पाठीमागे राज्यातील महायुती सरकार आणि संगमनेरचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी भक्कमपणे उभा राहील असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला
वसंगमनेरच्या व्यापाऱ्यांनी त्यागातून व कष्टातून ही संगमनेरची बाजारपेठ उभी केली आहे त्यामुळे जर चुकीचे काम कर णाऱ्यांना अधिकारी पाठबळ देत असेल तर त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाईल असा इशारा देत आमदार खताळ म्हणाले की जर येथून पुढे कोणी व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर त्यांना महायुती स्टाईलने उत्तर दिले जाईल असाही इशारा आ अमोल खताळ यांनी दिला आहे सध्या येथून पुढे जर कोणी व्यापाऱ्यांना त्रास देत असेल तर त्यांच्यावर निश्चितच कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या सूचना अन्न औषध प्रशासन व पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. येथून पुढील काळात संगमनेर दहशतमुक्त व भयमुक्त होण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्रित राहुन ही एकजूट कायम दाखवावी असे आव्हान आमदार खताळ यांनी केले

यावेळी हे होते मान्यवर व्यापारी उपस्थित
यावेळी संगमनेर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष योगेश कासट उपाध्यक्ष सुमेध संत सेक्रेटरी शरदगांडोळे ओंकारनाथ भंडारी श्री गोपाल पडतानी ज्ञानेश्वर कर्पे शिरीष मुळे सुमतीलाल दरडा संतोष दरडा विलास दरडा वैभव दरडा गुरुनाथ बाप्ते विशाल पडतानी आनंद दरडा आशिष राठी रवी धात्रक नितीन गुंजाळ सचिन शिंदे सुजित खटोड गिरिधारी असावा प्रकाश वालझाडे, प्रशांत कासट सचिन राठी यांच्यासह संगमनेर शहरा तील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!