संगमनेरात मराठा आरक्षणाचा महायुती कडून जल्लोष
संगमनेर / लोकवेध live न्यूज
मराठा समाजाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या त्यामुळे संगमनेर बस स्थानकावर सकल मराठा समाज आणि महायुतीच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला .
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी मराठा समाज नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर पाच दिवसापासून उपोषण सुरू होते राज्य शासनाने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या त्यामुळे जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आणि आरक्षणाची लढाई जिंकली हे वृत्त संगमनेरात येतात सकल मराठा समाज आणि महायुतीच्या वतीने संगमनेर बस स्थानकाजवळ एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी बस स्थानक परिसर दणाणून गेला होता यावेळी ज्येष्ठ नेते वसंतराव गुंजाळ भाजप तालुका अध्यक्ष गुलाब भोसले भाजप युवा मोर्चा जिल्हा ध्यक्ष रोहित चौधरी शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी उपजिल्हा प्रमुख रमेश काळे दिपाली वाव्हळ रेखा गलांडे सौरभ देशमुख ,सिताराम पानसरे आशिष कानवडे सार्थक शेवाळे वरद बागुल शशांक नामन अक्षय चिलप भैय्या सातपुते ओंकार राऊत यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते7 मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
