छत्रपती सहकारी दूध उत्पादक संस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

संगमनेर  / लोकवेध live न्यूज

छत्रपती सहकारी दूध उत्पादक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दिनांक १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. संस्थेचे अध्यक्ष दिनकर वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.

या वेळी प्रमुख उपस्थितीमध्ये व्हा. रावसाहेब ठोंबरे, संचालक शिवराम वाकचौरे, शिवाजी राहिंज, कुंडलिक ठोंबरे, किशोर जोर्वेकर, राहुल निकम, प्रदीप रक्टे, मच्छिंद्र काळे, किरण देशमुख, सौ. ज्योती अभंग, सौ. छाया वर्पे, सचिव प्रल्हाद ठोंबरे, संकलक लहानु ठोंबरे आदी मान्यवर तसेच संस्थेचे मोठ्या संख्येने सभासद व दूध उत्पादक उपस्थित होते.

सभेत २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, व्यापारी ताळेबंद, नफा-तोटा पत्रक सादर करण्यात आले. संस्थेच्या प्रगतीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यावर माफक चर्चा झाली. तसेच संस्थेच्या परिसरात सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यास मान्यता देण्यात आली.

या प्रसंगी जास्तीत जास्त दूध घालणाऱ्या सभासदांचा सत्कार करून त्यांना किटल्या प्रदान करण्यात आल्या. त्यात प्रथम क्रमांक किशोर जोर्वेकरद्वितीय क्रमांक किरण देशमुखतृतीय क्रमांक मच्छिंद्र काळेचतुर्थ क्रमांक शिवाजी दिघे तर पाचवा क्रमांक रमेश वाकचौरे यांनी पटकावला.

संस्थेच्या वतीने दूध उत्पादकांना आणखी दूध उत्पादन वाढवण्याचे तसेच नवीन सभासदांना संस्थेशी जोडण्याचे आवाहन करण्यात आले. संस्थेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भविष्यात आणखी प्रगती होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!