सत्यशोधक बनून एकतेतून समाजहित जपणारे रयतचे शिक्षण लोकशाहीच्या हिताचे – मा सुधीरजी लंके साहेब
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
रयत शैक्षणिक संकुल, सात्रळ ता.राहुरी येथे थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 138 वा जयंती समारंभ दैनिक लोकमत, अहिल्यानगरचे निवासी संपादक मा. सुधीरजी लंके साहेब,यांचे शुभहस्ते, प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव निवृत्ती अनाप यांचे अध्यक्षते खाली व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सिताराम गारुडकर यांनी केले. त्यानंतर प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मधुकर अनाप यांचाही सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथीचे स्वागत व परिचय करून देताना अरुण कडू पाटील यांनी सांगितले की आज शिक्षण व आरोग्य महाग होत चालले आहे. या विषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रात रयत चांगल्या पद्धतीने काम करत आहे याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले कर्मवीरांचे कार्यकर्ते असल्याचा अभिमान व शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार काम करत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सुधीरजी लंके साहेब यांनी सांगितले की सध्याच्या काळात धर्मोत्सव साजरे करण्यापेक्षा सत्यशोधक बनून एकतेतुन समाजहित जपणारे रयतचे शिक्षण लोकशाहीच्या हिताचे आहे.धर्माकडे विशेष लक्ष देण्यापेक्षा शिक्षणाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे दाखले देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.विज्ञानवादी विद्यार्थी बना निरीक्षणातून बाबी आत्मसात करा राजर्षी शाहू महाराजांचे दाखले देत शिक्षण न घेणाऱ्यांसाठी दंड करावे याचा विशेष उल्लेख त्यांनी केला सरकारच्या खालोखाल रयत शिक्षण संस्थेने काम केलेले असून कर्मवीरांच्या कमवा व शिकायला योजना माणसाला कशी स्वावलंबी बनवते हे पटवून दिले अन्याय सहन न करणारे कर्मवीरांचे खरे विद्यार्थी आहे निरीक्षण कराल,वाचाल तेव्हा विचार करायला शिकाल तुम्ही विज्ञानवादी बना इंग्लंड मधील आठवणी सांगताना स्वच्छता शिस्त याविषयीची माहिती देऊन तंत्रज्ञानाचा वापर तेथे कसा केला जातो हे सांगून शेती विषयी कामकाज कसे चालते याविषयी मार्गदर्शन केले भाषेतील नम्रता सांगून लोकशाहीच्या उत्साहात लोक कसे सहभाग घेतात हे उदाहरणे देऊन त्यांनी पटवून दिले. तुलनात्मक विचार केला तर आपण याबाबत जागृत होणे गरजेचे आहे ज्ञान मिळवून अण्णांच्या स्वप्नातील विद्यापीठ तयार व्हावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली उच्च शिक्षण मोफत व सक्तीचे व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत जाण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमास प्रगती पतसंस्थेचे चेअरमनॲड विजयराव कडू पा. बाळासाहेब विखे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजीराव चोरमुंगे पा. युवा नेते किरण कडू पा.स्थानिक स्कूल कमिटी, सदस्य,पंकज कडू पा. उद्योजक सुखदेव मुसमाडे नामदेवराव गुंजाळ जय हिंद फाऊंडेशन संगमनेर, भास्करराव फणसे, मा. सरपंच गणेश,हिरानंदानी शेठ,किशोर भांड,चेअरमन दिनकराव कडू पा,मा विभागीय अधिकारी शिरसाठ, मा.प्राचार्य मधुकर अनाप, रयत संकुलचे प्राचार्य सिताराम गारुडकर, मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे, पर्यवेक्षिका हेमलता साबळे, प्रा. विलास दिघे, आदी शिक्षणप्रेमी मान्यवर, सेवकवृंद ,सर्व शालेय कमिटी सदस्य, विद्यार्थी विद्यार्थिनी व समस्त ग्रामस्थ सात्रळ, सोनगाव, धानोरे ,पाथरे , हनुमंतगाव पंचक्रोशी रयत शैक्षणिक संकुल सात्रळ , शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते . जयंती दिनानिमित्त डॉ. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक रयत संकुल सात्रळ येथून मोठ्या उत्साहामध्ये , घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात , झांज , लेझीम, टिपऱ्या यांच्या पथकाचे लक्षवेधी प्रात्यक्षिक चौकाचौकात दाखवत पंचक्रोशीतून मिरवणूक काढण्यात आली. पथकाचे संचलन सचिन पलघडमल , सचिन खंडागळे, बाबासाहेब बर्डे, पुरब सूर्यवंशी, मिना निकम यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिन पलघडमल , रामदास तांबे यांनी तर आभार मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे यांनी मानले .
