इनरव्हिल क्लब अंबाजोगाई कडून पूरग्रस्तांसाठी ममतेचा हात – राक्षसवाडीतील ३५ कुटुंबांना दिलासा

देवळा / लोकवेध live न्यूज / सुरेश मंत्री

अलीकडील अतिवृष्टीमुळे राक्षसवाडी परिसरातील अनेक कुटुंबांवर संकट कोसळले. घरातील अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने ग्रामस्थ संकटात सापडले असताना इनरव्हिल क्लब अंबाजोगाईने ममतेचा हात पुढे करून मानवतेचे खरे दर्शन घडवले.

या सामाजिक जाणिवेने प्रेरित उपक्रमांतर्गत पूरग्रस्त ३५ कुटुंबांना एका महिन्यासाठी पुरेल इतक्या अन्नधान्य व दैनंदिन वापरातील वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. या मदतकार्यामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचा किरण झळकला.

या कार्यात क्लबच्या अध्यक्षा संगीता नावंदर यांच्या नेतृत्वाखाली शितोळे मॅडम, सुनीता कात्रेला, सुरेखा कचरे या क्लब सदस्या मनापासून सहभागी झाल्या होत्या. गावचे सरपंच राम कांबळे यांनी या मदतकार्याचे मनापासून कौतुक केले. तसेच अॅड. अजय बुरांडे यांनी या उपक्रमासाठी आवश्यक सहकार्य दिले.

पूराने उद्ध्वस्त झालेल्या जनतेला दिलासा देणाऱ्या या संवेदनशील उपक्रमामुळे इनरव्हिल क्लबच्या सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटला आहे. संकटाच्या काळात माणुसकीचे बंध जपणाऱ्या या स्त्रियांच्या कार्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून राक्षसवाडीतील ग्रामस्थांच्या ओठावर एकच शब्द – “धन्यवाद इनरव्हिल क्लब!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!