कनोली येथे ‘आरोग्य शिक्षण’ कार्यक्रम उत्साहात संपन्न.
किडनीचे आरोग्य म्हणजे संपूर्ण शरीराचे आरोग्य – डॉ. देसले
संगमनेर / लोकवेध live न्यूज
गॉड्स असेंबल मिनिस्ट्री संस्थे अंतर्गत दिनांक 5 ऑक्टोंबर 2025 रोजी कनोली या गावात आरोग्य शिक्षण हा कार्यक्रम घेण्यात आला, गॉड्स असेंबल मिनिस्ट्री संस्थेच्या अध्यक्षा उज्वलाताई जगताप, कनोली गावचे सामाजिक कार्यकर्ते मा. मच्छिन्द्र जगताप सर, मा. विशाल सर , मा. डॉ देसले यांच्या उपस्थितीत पार पडला.

मा.विशाल सर यांनी मार्गदर्शन करताना म्हटले आरोग्य शिक्षण म्हणजे आपल्या शरीर, मन आणि पर्यावरण याबद्दल योग्य माहिती मिळवणे आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आवश्यक सवयी अंगीकारणे.
सामाजिक कार्यकर्ते मा. मच्छिन्द्र जगताप सर यांनी बोलताना म्हटले आरोग्य शिक्षणामुळे व्यक्तीला चांगले आणि वाईट आरोग्याच्या सवयींचा फरक कळतो. शरीरासाठी कोणते अन्न उपयुक्त आहे, हे समजल्यामुळे पौष्टिक आहार घेण्याची सवय लागते. स्वच्छता, व्यायाम आणि विश्रांती यांचा जीवनात समतोल राखणे सोपे जाते.तणाव, चिंता यांचे व्यवस्थापन करण्याची सवय लागते. मद्यपान, धूम्रपान किंवा नशा यांसारख्या सवयींपासून व्यक्ती दूर राहतात.लसीकरण, स्वच्छ पाणी, आणि स्वच्छता यामुळे अनेक रोग टाळता येतात.समाजात आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी प्रोत्साहन मिळते, निरोगी व्यक्ती म्हणजे निरोगी समाज आणि सुदृढ राष्ट्र निर्माण होईल.
मा.डॉ. देसले यांनी किडनीचे आरोग्य महत्त्वाचे आहे याबद्दल माहिती दिली.
किडनी आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. ती शरीरातील अपायकारक द्रव्ये आणि विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम करते. किडनी शरीरातील पाण्याचे संतुलन, रक्तदाब आणि खनिजांचे प्रमाण योग्य ठेवते. त्यामुळे किडनी निरोगी राहणे अत्यंत गरजेचे आहे.
किडनीचे आरोग्य जपण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात:
1. पुरेसे पाणी प्या त्यामुळे शरीरातील अपायकारक द्रव्ये बाहेर जातात.
2. मीठाचे सेवन कमी करा , जास्त मीठामुळे रक्तदाब वाढतो आणि किडनीवर ताण येतो.
3. धूम्रपान व मद्यपान टाळा हे किडनीला हानी पोहोचवतात.
4. संतुलित आहार घ्या फळे, भाज्या आणि कमी तेलकट पदार्थ खा.
5. नियमित आरोग्य तपासणी करा — वेळेवर निदान केल्यास आजार वाढण्यापूर्वी नियंत्रणात आणता येतात.
थोडक्यात, किडनीचे आरोग्य म्हणजे संपूर्ण शरीराचे आरोग्य. किडनी निरोगी राहिली तर आपले जीवन निरोगी आणि आनंदी राहते.
