दुधाच्या टँकरने पुन्हा घेतला दोघांचा बळी­
 गगनगरी विद्यालयाचे सहशिक्षक अजय नन्नवरे सर जागीच ठार
संगमनेर /  लोकवेध live न्युज
संगमनेर तालुक्यात पुन्हा एक मोठा अपघात झाला आहे. आज शिक्षक आणि अन्य कर्मचारी यांचे आंदोलन मिटते कोठे नाहीतर आपले काम आटपून घराकडे निघालेल्या शिक्षकांचा आणि पिकअप चा संगमनेर शहरालगत असणाऱ्या सायखिंडी फाट्यावर अपघात झाला. ही घटना सोमवार दि. २० मार्च २०२३ रोजी सायंकाळी घडली. यात अजय चंद्रभान ननवरे (वय ३६, रा. सायखिंडी, ता. संगमनेर) व विलास रविंद्र ठोंबरे (वय २३, रा. शिवलवाडी, ता. मंचर) अशी दोघे मयत झाली आहेत. या अपघातामुळे संगमनेर पुन्हा हदरले आहे. कारण, गेल्या दोन दिवसापुर्वी चिखलीच्या तिघा तरूणांचा अपघातात मृत्यू झाला होता. तर, त्यापुर्वी खराडी वाघापूर येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे, गेल्या आठवडाभरात सात जणांचा अपघाती मृत्यु झाला आहे.
 याबाबत सविस्तर माहिती अशी की,  संगमनेर तालुक्यातील पिंपरणे काल आंदोलन झाल्यानंतर आज नन्नवरे सर हे आपल्या शाळेवर आपल्या मित्रासोबत गेले होते. दोघेही शिक्षक असल्यामुळे एकाच गाडीवर गेले आणि शाळेचे काम आटोपल्यानंतर माघारी फिरले होते. मित्राला त्याच्या घराकडे सोडल्यानंतर नन्नवरे सर सायखिंडी येथे चालले होते. ते सायखिंडी फाट्यावर असताना नाशिक येथून एक दुधाचा छोटा टँकर पुण्याकडे चालला होता.  वाहनाचा इतका वेग होता. की, त्याने डिव्हायडर (दुभाजक) तोडून विरुद्ध बाजुने चाललेल्या नन्नवरे सरांच्या गाडीला जोराची धडक दिली.
दरम्यान, काही कळण्याच्या आत किंवा सावध होण्यापुर्वीच एम.एच १४ एच यु •००५५ हा टँकर आला आणि नन्नवरे सरांचा जीव घेऊन गेला. हा अपघात इतका भयानक होता. की, संबंधित दुधाचा टँकर तीन ते चार पलट्या खावून थेट शेजारी दहा ते पंधरा फुट खोल असणाऱ्या खड्ड्यात जाऊन पडला. यात टँकरचा चालक विलास रविंद्र ठोंबरे याचा देखील जागीच मृत्यू झाला. हा प्रकार तेथील काही व्यक्ती आणि प्रवासी यांना पाहिला असता एकाच पाळापळ झाली. उपस्थित व्यक्तींनी पळापळ केली. दोघांवर उपचार करण्यासाठी ऍम्ब्युलन्स देखील बोलविली. मात्र, तोवर फार उशिर झाला होता. ठोंबरे यांच्या मृतदेहाची फारच वाईट स्थिती झाली होती. तर, नन्नवरे सरांना शहरातील एका रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याचा काही एक फायदा झाला नाही. ही घटना तालुक्यात अगदी वाऱ्यासारखी पसरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!