पुरोगामी विचार रुजविण्याचे काम के. जी.करतील : माजी मंत्री बाळासाहेब थोरात
पुढील काळात उपेक्षिताना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे कार्य के.जी. सरांनी करावे : विधीज्ञ संघराज रूपवते.
संगमनेर..
शासनाने सेवा कार्याची ठरवून दिलेली वयोमर्यादा पूर्ण करून के.जी.भालेराव सर खऱ्या अर्थाने सेवा कार्याच्या बंधनातून आज मुक्त झाले आहेत. यापुढील बंधन मुक्त
काळात त्यांच्या हातून समाज प्रबोधना बरोबर गोरगरीब उपेक्षित राहिलेल्याना, राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे मोठे काम करावे. अशी अपेक्षा व्यक्त केली व आजची सामाजिक गरज ओळखून सरांनी सुरु केलेल्या अभ्यासिके सारख्या सामाजिक उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन, जेष्ठ नेते विधीज्ञ संघराज रुपवते यांनी दिले.
ज्येष्ठ साहित्यिक कार्यकर्ता के.जी.भालेराव सर सेवापूर्ती गौरव समितीच्या वतीने आयोजित आयु. के.जी.भालेराव सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी, सरांचा सपत्नीक मानचिन्ह व माणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच ‘कार्यकर्ता ‘ या गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी विधीज्ञ
रूपवते बोलत होते. व्यासपीठावर भालेराव सर, पत्नी कल्पना भालेराव तसेच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, युवा कार्यकर्त्या उत्कर्ष रूपवते, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष राजा कांदळकर, मिलिंद कसबे, हिरालाल पगडाल, सीताराम राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते.
ऍड. रुपवते पुढे म्हणाले की, शिक्षक, लेखक, सामाजिक चळवळीचे अतिशय व्यापक व दूरदृष्टी लाभलेले, व्यक्तिमत्व म्हणजे भालेरावसर आहेत. त्यांनी आपल्या सेवा कार्यात विद्यार्थ्यांन बरोबरच समाजातील उणीवा,अनिष्ट रूढी, परंपरा याच्यावर प्रहार करणारे विचार आपल्या विविध पुस्तकातून प्रकट करून सामाज्याला दिशा देण्याचे काम केले आहेत. आज सरांकडे व ते करत असलेल्या कार्याकडे पहिल्या नंतर त्यांना व त्यांच्या सारखे धडाडीने कार्य कारणाऱ्यांना सरकारणे वयाचे बंधन न ठेवता सेवेत ठेवणे व सहकार्य करणे त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक अनुभवाचा समाज प्रगती साठी उपयोग करून घेणे अपेक्षित आहे. परंतु सरकार त्यांना ही नियमा नुसार सेवानिवृत्त करते. असे का घडते हे मात्र समजत नाही. अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, समाज्यातील उपेक्षित घटकला न्याय मिळून देण्यासाठी के.जी.भालेराव सर हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक चळवळीत भाग घेतला. वेळप्रसंगी न्याय-हक्कासाठी मोर्चा काढून लढा दिला आहे. त्यासाठी अनेकदा पदर मोड देखील केली आहे. त्यातून, त्यांना पायावर उभे करण्याचे काम सर करत आहेत. सर आज सेवा निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता तर त्यांना या चळवळीच्या कामासाठी वेळच वेळ मिळणार आहे. त्यातून त्यांच्या हातून मोठे सामाजिक कार्य घडावे. अशी अपेक्षा व्यक्त केली.
राजा कांदळकर म्हणाले,आज सामाजिक कार्यासाठी वेळ देणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. अशा या परिस्थितीत समाजासाठी वेळ देऊन, सामाज्याला दिशा देण्याचे काम सर, करत आहे.अशा व्यक्तींना सहकार्य करून, प्रोसाहीत करण्याचे काम करणे गरजेचे आहे. ते कार्य अशा समारंभा तुन घडते.व यातून इतरांनाही प्रेरणा मिळते.
उत्कर्षा ताई रूपवते म्हणाल्या, सरांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना, समाजातील उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या पवित्र चळवळीत आणण्यासाठी मोठे कार्य केले आहे. सर आता सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. त्यामुळे ते पुढील काळात अधिक जोमाने ते सामाजिक कार्य करत राहतील. अशी अपेक्षा व्यक्त केली.
मिलिंद कसबे, यांनी आज पर्यंत सुरु असलेल्या सामाजिक अन्याय कारक परिस्थितीकडे लक्ष वेधून, ही अन्याय कारक परिस्थिती बदलण्यासाठी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुढे येऊन सामाज जागृती साठी संघटित होण्याची गरज व्यक्त केली.
जेष्ठ नेते हिरालाल पगडाल यांनी, भालेराव सरांच्या सामाजिक कार्याचा व संघर्षाचा आढावा घेत, समाज्याच्या काही व्यथानंकडे लक्ष वेधले. तसेच समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी आज ही संघर्ष करावा लागत आहे. ही चळवळ अधिक जोमाने संघटितरित्या पुढे नेण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे असे मत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देतांना के जी भालेराव म्हणाले, आज सत्य व असत्याचा लढा सुरु आहे. त्यात असत्य प्रबळ होत आहे. त्यामुळे सामाजिक एकता ढसळत आहे.समाजातील सत्याने वागणाऱ्यांनी संघटित होऊन हे थांबविण्यासाठी लढा उभारला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
सेवापुर्ती गौरव समितीचे निमंत्रणक सूर्यकांत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अनुराधा आहेर, रवी दिवे यांनी सूत्रसंचालन केले, मानपत्र वाचन विनय घोसाळे यांनी केले तर आभार समीर लामखडे यांनी मानले.
याप्रसंगी जेष्ठ नेते डॉ. सोमनाथ मुटकुळे,प्रा.डॉ.संतोष पवार, प्रा.पोपट सातपुते, विठ्ठलराव शेवाळे सह सरांचे मित्र, विद्यार्थी, नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते.
पुरोगामी विचार रुजविण्याचे काम के. जी.करतील : माजी मंत्री बाळासाहेब थोरात..
के.जी. भालेराव सरांनी यापुढील काळात पुरोगामी विचार रुजविण्याचे काम करून लोकशाही व राज्य घटना वाचविण्याचे काम करावे. अशी अपेक्षा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त करून शुभेच्छा देत व त्याचा सत्कार केला.
माणिकराव यादव, डॉ. रवींद्र घोसाळे, कुसुम माघाडे, अनिकेत घुले, विकास वाव्हळ, सचिन साळवे, ज्ञानेश्वर राक्षे, आदी सेवा गौरव समितीच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले.
