स्वागत कमानी मुळे गावाच्या वैभवात भर – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर ( प्रतिनिधी )
तालुक्यातील रायते या गावात आदिशक्ती मुक्ताई माता मंदिराजवळ सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याकडून नागरिकांच्या आग्रहास्तव स्वागत कमान देण्यात आली. तिचे लोकार्पण माजीमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व गावकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी समवेत ॲड.नानासाहेब शिंदे, रामहरी कातोरे, मार्केट कमिटीचे संचालक कैलास पानसरे,रमेश भाऊ गुंजाळ,बाळासाहेब राहणे,संपत खर्डे, भाऊसाहेब खर्डे,पांडुरंग नवले, महादू खर्डे, नानासाहेब खर्डे, रमेश गफले,सुरज पानसरे,सुदाम खर्डे,राहुल शिरतार,शशिकांत कडलग,सुरज खर्डे, कलीम पिरजडे,चेतन मेने आदी सह युवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, रायते गावात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने एक स्वागत कमान हवी अशी मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून ग्रामस्थांची होती. नवरात्र उत्सवामध्ये आदिशक्ती मुक्ताई माता देवीचा कार्यक्रम येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भाविकांसाठी दररोज किर्तन भजन व शेवटी महाप्रसाद या प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन नवरात्र कमिटी व युवकांच्या वतीने होत असते. ही गावची धार्मिक बाब कौतुकास्पद आहे.
थोरात कारखान्याने तालुक्याच्या विकासात कायम महत्त्वाची भूमिका मांडली आहे. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत कारखाना नेहमीच करत असतो. नवीन स्वागत कमानीमुळे गावच्या वैभवात भर पडली असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्केट कमिटीचे संचालक कैलास पानसरे यांनी केले. यावेळी नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
