पिंपरणेत क्रिकेटचा जल्लोष; मा. रणजितदादा हाफ टेनिसबॉल क्रिकेट करंडक २०२५चा थरारक अंतिम सामना व भव्य बक्षीस वितरण
 संगमनेर
मा. रणजितसिंह देशमुख युवा मंच, पिंपरणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मा. रणजितदादा हाफ टेनिसबॉल क्रिकेट करंडक २०२५ या भव्य क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवार दि. २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अंतिम सामन्यासाठी मैदानावर क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी उसळली होती.
या अंतिम सामन्यासाठी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्रीताई थोरात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे संचालक इंग्रजीत थोरात, सामाजिक कार्यकर्ते शरदनाना थोरात, रवींद्र रोहम, दादासाहेब देशमुख, अरुणराव देशमुख, राजेंद्र देशमुख, तुळशीराम मलगुंडे देशमुख, नवनीत देशमुख, पोलीस पाटील विनोद साळवे, संजय बागुल, अण्णासाहेब राहींज, मिनीनाथ जोर्वेकर, बाबासाहेब राहींज, भाऊराव राहींज आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
ही स्पर्धा १५ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत, तलाठी कार्यालय शेजारी, पिंपरणे येथे खेळविण्यात आली. अंतिम सामन्यात खेळाडूंनी दाखवलेली चुरशीची लढत, चौकार-षटकारांचा पाऊस आणि शिस्तबद्ध खेळ यामुळे प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले. स्पर्धेचा अंतिम सामना सामनगाव नाशिक रोड व रणजितसिंह युवा मंच पिंपरणे यांच्यात अतिशय चुरशीचा झाला
यावेळी स्पर्धेत सामनगाव (नाशिकरोड) संघाने प्रथम क्रमांक पटकावत ₹५१,००० रोख रक्कम व चषक मिळविला. रणजितसिंह देशमुख युवा मंच, पिंपरणे संघाने द्वितीय क्रमांक मिळवून ₹३१,००० व चषक, तर शेडगाव क्रिकेट संघाने तृतीय क्रमांक मिळवून ₹२१,००० व चषक पटकाविला. छत्रपती नांदूर शिंगोटे संघाने चतुर्थ क्रमांक (₹११,००० व चषक) तर कनोली संघाने पाचवा क्रमांक (₹७,००० व चषक) मिळविला.
स्पर्धेतील सातत्यपूर्ण व उत्कृष्ट खेळासाठी कनोली संघाच्या अजित वर्पे यांना ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना मान्यवरांनी युवकांनी खेळातून शिस्त, संघभावना व आरोग्य जपावे, असे आवाहन केले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी धनंजय देशमुख, हर्षल काळे, सुमित देशमुख, अक्षय खडांगळे, मयुर देशमुख, शुभम काळे, प्रदिप मांडे, प्रसाद मांडे, तुषार देशमुख, मयुर काळे, अमोल राहिंज, अविनाश खडांगळे, विक्रम देशमुख, यशराज देशमुख यांच्यासह समस्त ग्रामस्थ पिंपरणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
खेळ, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणारी ही स्पर्धा पिंपरणेकरांसाठी अविस्मरणीय ठरली, अशी भावना उपस्थित क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!