देवगड खंडोबा मंदिरातील दानपेटी फोडली
अज्ञात चोरट्यांनी लांबविले आठ हजार रुपये
संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
संगमनेर / लोकवेध live न्यूज /अण्णासाहेब काळे
अज्ञात चोरट्याने हिवरगाव पावसा येथील खंडोबा मंदिरातील लोखंडी दानपेटी फोडत त्यातील सुमारे आठ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री साडेनऊ ते मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात मोठ्याभाऊ भाऊराव बढे (वय ५७ वर्ष, धंदा शेती, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. बढे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अज्ञात चोरट्याने खंडोबा देवस्थानच्या मंदिरातील लोखंडी कायमस्वरूपी दानपेटी फोडून त्यातून सुमारे आठ हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे.
यासंदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एस. एस. पाटोळे पुढील तपास करीत आहे.
