मल्हारराव होळकर विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
संगमनेर | प्रतिनिधी
मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अंभोरे येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. सहादु खेमनर पाटील हे होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्कूल कमिटीचे पदाधिकारी श्री. रावसाहेब खेमनर, श्री. सोपानराव खेमनर, श्री. रावजी खेमनर, श्री. भागवत खेमनर, माजी प्राचार्य श्री. किसन खेमनर, श्री. भाऊसाहेब खेमनर, श्री. बाबुराव जगनर, श्री. सुभाषराव हळनोर, श्री. पोपट खेमनर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा
प्रास्ताविकात विद्यालयाचे प्राचार्य श्री. लक्ष्मण गाडेकर यांनी वर्षभरात राबविण्यात आलेल्या सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, सांस्कृतिक, कला व क्रीडा विषयक उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वकृत्व स्पर्धा, वैयक्तिक खेळ, सांस्कृतिक स्पर्धा आदी उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यालयासमोरील अपूर्ण सुविधा व पुढील शैक्षणिक वर्षातील आव्हानांबाबतही त्यांनी माहिती दिली.
गुणवंत शिक्षक, शिक्षिका व सेवकवृंद यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मान्यवरांचे मनोगत
माजी प्राचार्य श्री. के. जी. खेमनर यांनी विद्यालयाच्या होत असलेल्या प्रगतीबद्दल प्राचार्य गाडेकर व सर्व शिक्षकांचे कौतुक करून आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
श्री. सुभाषराव हळनोर यांनी मनोगतात विद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंत झालेल्या बदलांचा उल्लेख करून शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. ग्रामीण भागातील शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात विद्यालयाचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच अंभोरे गावात लवकरच उभारण्यात येणाऱ्या तीन मजली भव्य विद्यालय इमारतीच्या पायाभरणीचा उल्लेख करून ही इमारत गावाच्या शैक्षणिक विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
विद्यार्थ्यांचा गौरव
शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक व विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारप्राप्त विद्यार्थी आनंदित दिसत होते, तर इतर विद्यार्थ्यांनी पुढील वर्षी यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक श्री. अशुतोष वालझाडे, कॉलेज इन्चार्ज श्री. कडनर, श्री. गुंजाळ, श्रीमती महानोर तसेच शिक्षक प्रतिनिधी श्री. सुपेकर, श्री. भालेराव, श्री. कुदळ, श्री. जम्बुकर, श्रीमती सोनवणे, श्रीमती तारडे, श्रीमती शिंदे, श्रीमती काळे, श्रीमती वर्पे, श्रीमती कडनर, श्री. बिडगर, श्री. बर्डे, श्री. मोरे आदी शिक्षक व सेवकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री. संजय शिरसाठ सर सूत्रसंचालन श्री. श्याम वैराळ सर व श्री. काकड सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. यादव सर यांनी मानले.
